मुंबई, 09 मार्च : आयपीएलच्या तेराव्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभागी होतात. यामुळे वेगवेगळ्या देशातील खेळाडू एकमेकांचे मित्रही होतात. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमधून खेळणारा विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांची मैत्री तर सर्वांनाच माहिती आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर त्यांच्या दोस्तीचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. आय़पीएल 2020 सुरु होण्याआधी आता पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीची झलक बघायला मिळाली. विराट आणि एबी यांच्यात ट्विटरवर रंगलेला संवाद चर्चेत आला आहे. व्हॉटसअॅपवर चॅट करावं तसं दोघेही ट्विटरवर बोलत होते. चॅटिंगची सुरुवात एबी डिव्हिलियर्सने केली. त्यावर विराटने मजेशीर उत्तर दिलं आहे. दोघांचीही ट्विटरवरील ही गंमत जंमत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एबी डिव्हिलियर्सनं ट्वीट करून विराटला काय करत आहेस असं विचारलं.डिव्हिलियर्सच्या प्रश्नाचे उत्तर विराटने इमोजी पाठवून दिलं. यात सोफा आणि टीव्हीचा इमोजी वापरून विराटनं आरामात टीव्ही बघतोय असंच काहीसं सांगितलं.
🛋️📺
— Virat Kohli (@imVkohli) March 9, 2020
विराटने दिलेल्या उत्तरावर पुन्हा डिव्हिलियर्सनं त्याला डिवचलं. त्यानं बॅटचा इमोजी टाकला होता. यावर विराटनं प्रश्नचिन्ह टाकलं आहे. यावर एक व्हिडिओ डिव्हिलियर्सने पोस्ट केला. त्यानंतर मात्र विराटनं रिप्लाय दिला नाही.
— AB de Villiers (@ABdeVilliers17) March 9, 2020
आयपीएलचा उद्घाटनाचा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना होईल. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स 31 मार्चला आमने सामने येतील. विराट कर्णधार असलेल्या आरसीबीला एकदाही विजेतेपद जिंकता आलेलं नाही. हे वाचा : कोरोनामुळे ठाकरे सरकार करणार IPL रद्द? ‘या’ दिवशी होणार फैसला