Home /News /sport /

न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा हा क्रिकेटपटू फ्लॉप, आता झळकावलं शतक

न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा हा क्रिकेटपटू फ्लॉप, आता झळकावलं शतक

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने टी20 मालिका जिंकली पण त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत दारुण पराभव झाला होता.

    नवी दिल्ली, 09 मार्च : भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन न्यूझीलंड दौऱ्यात फ्लॉप ठरला. त्यानंतर अश्विनने भारतातील एका सामन्यात खेळताना शतक साजरं केलं आहे. रविवारी झालेल्या सामन्यात अश्विनने फलंदाजीत कमाल केली. तामिळनाडु क्रिकेट असोसिएशनच्या डिव्हिजन लीगच्या सामन्यात अश्विनने शतकी खेळी केली. अश्विनने एमआरसी ए कडून खेळताना अल्वरपेटविरुद्ध 102 धावा केल्या. अश्विनने 180 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकारासह 102 धावांची खेळी केली. यात त्याने चौथ्या गड्यासाठी आर श्रीनिवासनसोबत शतकी भागिदारीही केली. आर श्रीनिवासनने 87 धावा काढल्या. न्यूझीलंड दौऱ्यानंतर आर अश्विन पहिल्यांदाच एखाद्या सामन्यात खेळला. न्यूझीलंडमध्ये त्याला पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली होती. वेलिंग्टन कसोटीत अश्विनला गोलंदाजी आणि फलंदाजीतही फारशी चमक दाखवता आली नाही. त्याला फक्त 3 गडी बाद करता आले. तर फलंदाजी करताना 4 धावाच अश्विनने केल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याला बाहेर बसवलं होतं. त्याच्या जागी रविंद्र जडेजाची वर्णी लागली होती. भारताकडून अश्विनने आतापर्यंत 71 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 28.10 च्या सरासरीने 2389 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतकांचा आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. हे वाचा : फायनलमध्ये 2 धावांवर बाद झाल्यानं शेफालीला आणखी एक धक्का न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाने टी20 मालिका 5-0 अशी जिंकली होती. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत मात्र भारताला मानहानीकारक पराभवाला सामोर जावं लागलं होतं. एकदिवसीय मालिका 3-0 ने आणि कसोटीत 2-0 ने टीम इंडियाचा पराभव झाला होता. हे वाचा : ऑस्ट्रेलियाला मिळाली 'छोटी' सचिन, 6 वर्षांच्या मुलीला पाहून घाबरला ब्रेट ली
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या