मुंबई, 12 जून : श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाकाच्या (Dasun Shanaka) सर्वोत्तम खेळीमुळे श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशक्य वाटणारा विजय मिळवला आहे. शनिवारी झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात यजमान टीमनं शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये 59 रन करत 4 विकेट्सनं विजय मिळवला. टी20 इंटरनॅशनलमधील हा रेकॉर्ड आहे. यापूर्वी कोणत्याही टीमला ही कामगिरी करता आली नव्हती. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत 176 रन केले. त्यानंतर श्रीलंकेची 17 व्या ओव्हरमध्ये 6 आऊट 108 अशी अवस्था झाली होती. 17 ओव्हरनंतर सर्वांनीच श्रीलंकेचा पराभव गृहित धरला होता. त्यावेळी कॅप्टन दासून शनाकाच्या मनात वेगळेच होते. त्याने टी20 इंटरनॅशनलमधील त्याची सर्वोत्तम खेळी करत टीमला 4 विकेट्सनं विजय मिळवून दिला. त्याचबरोबर 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप मिळवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्नही यशस्वी झाला नाही.
Chasing down 59 in the final three overs is the most scored by any team to win a game in the last three overs. 🤩#SLvAUS #CheerForLions pic.twitter.com/CKTVfnrcLz
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 11, 2022
शनाकानं पहिल्या 12 बॉलमध्ये संथ बॅटींग करत फक्त 6 रन केले होते. त्यानंतर पुढच्या 13 बॉलमध्ये त्याने तब्बल 48 रन केले. त्याने 17 व्या ओव्हरमध्ये 2, 18 व्या ओव्हरमध्ये 21, 19 व्या ओव्हरमध्ये 12 आणि शेवटच्या 20 व्या ओव्हरमध्ये 15 रन काढले. या पद्धतीनं त्यानं डेथ ओव्हरमध्येच अर्धशतक झळकावलं. यापूर्वी कोणत्याही बॅटरनं टी20 इंटरनॅशनलमध्ये टार्गेटचा पाठलाग करताना डेथ ओव्हर्समध्ये इतके रन केले नव्हते. तो 25 बॉलमध्ये 54 रन काढून नाबाद राहिला. या खेळीत त्यानं 5 फोर आणि 4 सिक्स लगावले. त्याचा स्ट्राईक रेट हा 216 इतका होता. IPL Media Rights : आयपीएल तोडणार बड्या फुटबॉल लीगचा रेकॉर्ड? आज होणार फैसला यापूर्वी ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 176 रन केले. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक 39 रन केले. स्टीव्ह स्मिथननं नाबाद 37 रन काढले. तर मार्कस स्टॉईनिसनं 23 बॉलमध्ये झटपट 38 रन करत टीमचा स्कोर 175 च्या पुढे नेला. तीन सामन्यांच्या या मालिकेत 114 रन करणारा ऑस्ट्रेलियन कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार देण्यात आला.