मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Media Rights : आयपीएल तोडणार बड्या फुटबॉल लीगचा रेकॉर्ड? आज होणार फैसला

IPL Media Rights : आयपीएल तोडणार बड्या फुटबॉल लीगचा रेकॉर्ड? आज होणार फैसला

भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयसाठी (BCCI) आज मोठा दिवस आहे. आज (रविवार), आयपीएल स्पर्धेच्या मीडिया राईट्सचे ई ऑक्शन (IPL Media Rights, E Auction) होणार आहे.

भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयसाठी (BCCI) आज मोठा दिवस आहे. आज (रविवार), आयपीएल स्पर्धेच्या मीडिया राईट्सचे ई ऑक्शन (IPL Media Rights, E Auction) होणार आहे.

भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयसाठी (BCCI) आज मोठा दिवस आहे. आज (रविवार), आयपीएल स्पर्धेच्या मीडिया राईट्सचे ई ऑक्शन (IPL Media Rights, E Auction) होणार आहे.

    मुंबई, 12 जून : भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयसाठी (BCCI) आज मोठा दिवस आहे. आज (रविवार), आयपीएल स्पर्धेच्या मीडिया राईट्सचे ई ऑक्शन (IPL Media Rights, E Auction) होणार आहे. सकाळी 11 वाजता मुंबईत ही प्रक्रिया सुरू होईल. पुढील पाच सिझनच्या मीडिया राईट्ससाठी ही बोली लागणार आहे. फुटबॉल लीगचा रेकॉर्ड तोडणार? अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीग (NFL) ही जगातील सर्वात महागडी लीग आहे. या लीगमधील प्रत्येक मॅचची किंमत ही 133 कोटी आहे. इंग्लिश प्रीमियर लीग (EPL) दुसऱ्या क्रमांकावर असून या लीगमधील प्रत्येक मॅचची किंमत 81 कोटी आहे. अमेरिकी बेसबॉल तिसऱ्या तर आयपीएल चौथ्या क्रमांकावर आहे. आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक मॅचची किंमत 54 कोटी होती. आता या ई ऑक्शननंतर आयपीएल या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदाच्या ऑक्शनंतर नवे रेकॉर्ड प्रस्थापित होतील अशी आशा BCCI ला आहे. यापूर्वी, स्टार इंडियानं 2017 साली आयपीएलचे मीडिया राईट्स 5 वर्षांसाठी खरेदी केले होते. त्याची मुदत आता संपली आहे. त्यावेळी स्टारनं हे राईट्स खरेदी करण्यासाठी 2.55 दशलक्ष डॉलर मोजले होते. ती तेव्हा जगातील सर्वात महाग क्रिकेट डील होती. 4 पॅकेजेस उपलब्ध आयपीएल राईट्ससाठी यंदा 4 पॅकेज उपलब्ध असतील. पॅकेज A मध्ये फक्त भारतीय उपखंडातील  प्रसारणाचे अधिकार देण्यात येतील. पॅकेज B मध्ये भारतीय उपखंडातील डिजिटल राईट्सचा समावेश आहे. पॅकेज C मध्ये मर्यादीत मॅचेसचे अधिकार देण्यात येणार असून ते फक्त भारतीय उपखंडातील प्रसारणासाठी असतील. तर पॅकेज D मध्ये जगभरातील अन्य भागांमध्ये प्रसारण आणि डिजिटल हक्कांचा समावेश आहे. IND vs SA 2ndT20 : कटकहून आली काळजीची बातमी, मॅचपूर्वीच वाढलं दोन्ही टीमचं टेन्शन आयपीएल मीडिया राईट्ससाठी चार कंपन्यांमध्ये रेस आहे, यात वायकॉम, डिज्नी हॉटस्टार, सोनी आणि झी यांचा समावेश आहे. गूगल आणि अमेझॉन या कंपन्यांनी या लिलावातून माघार घेतली आहे. 2023 ते 2027 या कालावधीसाठी मीडिया राईट्सची विक्री होणार आहे. यामधील शेवटच्या दोन वर्षांमध्ये आयपीएल सामन्यांची संख्या 74 वरून 94 करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचा फायदा देखील ही बोली जिंकणाऱ्या कंपन्यांना होणार आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, Ipl

    पुढील बातम्या