Home /News /sport /

शोएब अख्तरनं बॅटनं केला होता हल्ला, आफ्रिदीनं 14 वर्षांनी केला घटनेचा खुलासा

शोएब अख्तरनं बॅटनं केला होता हल्ला, आफ्रिदीनं 14 वर्षांनी केला घटनेचा खुलासा

पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) 14 वर्षांपूर्वी वादळ निर्माण करणाऱ्या घटनेवर शाहिद आफ्रिदीनं (Shahid Afridi) खुलासा केला आहे.

    लाहोर, 17 मे : पाकिस्तान क्रिकेटमध्ये 14 वर्षांपूर्वी वादळ निर्माण करणाऱ्या घटनेवर शाहिद आफ्रिदीनं (Shahid Afridi) खुलासा केला आहे. दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या टी 20 वर्ल्ड कपच्या दरम्यान शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar)  त्याचा टीममधील सहकारी मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) याच्यावर बॅटनं हल्ला केला होता. त्यावेळी घडलेल्या प्रकरणाला आफ्रिदी जबाबदार असल्याचा आरोप शोएब अख्तरनं त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. त्यावर अखेर आफ्रिदीनं स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हणाला आफ्रिदी? शाहिद आफ्रिदीनं एका मुलाखतीमध्ये या प्रकणावरील मौन सोडले. "टीममध्ये घडणाऱ्या अनेक घटनांमुळे खेळाडूंमध्ये एका परिवारासारखं नातं निर्माण झालेलं असतं. यामधील काही सदस्य हे इतरांची थट्टा करतात तर काही जणांना थट्टा सहन होत नाही. त्यावेळी घडलेल्या घटनेमध्ये माझा कोणताही हात नव्हता. मी शोएबला रागवलेलं पाहिल्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी हस्तक्षेप केला होता. मी केलेल्या एका थट्टेमध्ये आसिफनं मला साथ दिली. त्यामुळे शोएब नाराज झाला आणि पुढील सर्व प्रकार घडला. असं असलं तरी, शोएब मनानं खूप चांगला आहे. तो आक्रमक दिसतो. एका फास्ट बॉलर्ससाठी हे स्वाभाविक आहे." असा खुलासा आफ्रिदीनं केला आहे. काय होती घटना? दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या टी 20 वर्ल्ड कप दरम्यान शोएब अख्तरनं मोहम्मद आसिफला बॅटनं मारले होते. या प्रकरणातील चौकशीनंतर अख्तरला दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी बोलवण्यात आले. त्यानंतर अख्तरनं त्याच्या आत्मचरित्रामध्ये शाहिद आफ्रिदीमुळे हे प्रकरण चिघळले असा आरोप केला होता. विराट कोहलीच्या मदतीला धावला सलमान! इंग्लंडच्या माजी कॅप्टनला म्हणाला... 'आफ्रिदीमुळे परिस्थिती बिघडली. त्यानंतर मी दोघांवरही बॅट फिरवली. आफ्रिदी खाली वाकला पण आसिफ जागेवरच उभा होता. त्याला माझी बॅट लागली आणि तो खाली पडला. मी संतुलन गमावले होते. मी ड्रेसिंग रुममध्ये या प्रकारचा व्यवहार कधीही केला नव्हता.' असा दावा अख्तरनं आत्मचरित्रामध्ये केला आहे..
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pakistan, Shahid Afridi, Shoaib akhtar

    पुढील बातम्या