मुंबई, 16 मे : इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) यानं काही दिवसांपूर्वी विराट कोहली (Virat Kohli) वर टीका केली होती. त्या टीकेला पाकिस्तानामधून उत्तर मिळालंय. पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट (Salman Butt) यानं कोहलीचा बचाव करत मायकल वॉनला त्याच्या क्रिकेटमधील रेकॉर्डची आठवण करुन दिली आहे.
काय म्हणाला होता वॉन?
मायकल वॉननं न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याच्या खांद्यावरुन टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर (Virat Kohli) निशाणा साधला होता. 'विल्यमसन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला असता, पण विराट कोहली असेपर्यंत तो कधीही सर्वोत्तम खेळाडू ठरणार नाही, कारण तो भारतीय नाही,' असं वॉननं म्हंटलं आहे.
" माझ्या मते विल्यमसन तीन्ही प्रकारात सर्वोत्तम आहे. पण तो विराट कोहलीची बरोबरी करु शकत नाही. कारण, त्याचे इन्स्टाग्रामवर 100 मिलिअन फॉलोअर्स नाहीत, त्याच्याकडं जाहिराती नाहीत. त्यामुळे तो भक्कम कमाई करत नाही. सर्व जण विराटबद्दल चांगलं बोलतात. त्यामुळे त्याचे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढतात.'' असा दावा वॉननं केला आहे.
वॉनच्या या टीकेला सलमाननं उत्तर दिलं आहे. सलमान बटनं विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातील तुलना चुकीची असल्याचं मत व्यक्त केलंय. बटनं यूट्यब चॅनलवर बोलताना सांगितलं की, " विराट कोहली ज्या देशाचा आहे, त्याची लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्याचे फॅन्स जास्त आहेत. त्याशिवाय त्याचं प्रदर्शन देखील चांगलं आहे. विराटनं 70 आंतरराष्ट्रीय शतक झळकावली आहेत. सध्याच्या काळातील कोणताही बॅट्समन त्याच्या जवळपास नाही. विराट बऱ्याच काळापासून रँकींगमध्ये अव्वल आहे, कारण त्याचं प्रदर्शन चांगलं आहे. त्यामुळे आता तुलना करण्याची गरज काय ? हा प्रश्न मला पडतो.''
'प्रदर्शनाच्या नाही तर कनेक्शनच्या आधारावर होते सिलेक्शन' पाकिस्तानच्या माजी कॅप्टनचा आरोप
सलमाननं त्यानंतर इंग्लंडच्या माजी कॅप्टनला टोला लगावला आहे. " मायकल वॉन हा इंग्लंडचा चांगला कॅप्टन आणि टेस्ट बॅट्समन होता. पण त्यानं वन-डे मध्ये कधीही शतक झळकावलं नाही. त्याला वादग्रस्त बोलण्याची सवय आहे. भारतीय बॅट्समन आणि आयपीएलबद्दल तो यापूर्वी देखील वादग्रस्त बोलला आहे.'' असं सलमान बटनं सुनावलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Pakistan, Team india, Virat kohli