जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कितने आदमी थे! शोलेतील प्रसिद्ध डायलॉगवर टीम इंडियाच्या 'गब्बर' चा अभिनय, VIDEO

कितने आदमी थे! शोलेतील प्रसिद्ध डायलॉगवर टीम इंडियाच्या 'गब्बर' चा अभिनय, VIDEO

कितने आदमी थे! शोलेतील प्रसिद्ध डायलॉगवर टीम इंडियाच्या 'गब्बर' चा अभिनय, VIDEO

भारतीय क्रिकेटमध्ये ‘गब्बर’ नावानं प्रसिद्ध असलेल्या शिखर धवननं (Shikhar Dhawan) इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो ‘शोले’ या प्रसिद्ध हिंदी सिनेमातील डायलॉगवर अभिनय करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर : टीम इंडियाचा ओपनिंग बॅटर शिखर धवन (Shikhar Dhawan) काही काळापासून भारतीय टीमच्या बाहेर आहे. टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 सीरिजमध्ये त्याची निवड झाली नव्हती. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) त्यानं 5 मॅचमध्ये फक्त 58 रन काढले आहेत. या सर्व अडचणींनंतर धवन फॅन्सनं मनोरंजन करण्याचं काम करत आहे. भारतीय क्रिकेटमध्ये  ‘गब्बर’ नावानं  प्रसिद्ध असलेल्या धवननं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो ‘शोले’ या प्रसिद्ध हिंदी सिनेमातील डायलॉगवर अभिनय करत आहे. धवन त्याच्या समोरील व्यक्तीच्या केसाला पकडून ‘कितने आदमी थे!’ हा प्रश्न विचारतो. त्यावर ती व्यक्ती ‘पता नही जनाब’ असे उत्तर देते. धवनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जाहिरात

वन-डे टीममधील जागा धोक्यात शिखर धवनने विजय हजारे स्पर्धेतील पाच इनिंगमध्ये  0,12,14 आणि 18 रन केले आहेत, त्यामुळे त्याचं टीम इंडियातलं स्थान अडचणीत आलं आहे. याआधी भारताने वनडे सीरिज खेळली तेव्हा श्रीलंकेत शिखर धवन टीम इंडियाचा कर्णधार होता. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाडने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. ऋतुराजने या सिझनमधील 5 इनिंगमध्ये 4 शतकांसह 150 च्या सरासरीनं 603 रन केले आहेत. IND vs SA : 85 ची सरासरी असणारा खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा ऋतुराजच्या या जबरदस्त कामगिरीमुळे टीम इंडियाच्या वन-डे टीममधील धवनची जागा धोक्यात आली आहे.  दक्षिण आफ्रिका विरुद्ध जानेवारी महिन्यात होणाऱ्या तीन सामन्याच्या वन-डे मालिकेसाठी रोहित शर्माची कॅप्टन म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र टीम अद्याप जाहीर झालेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात