मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : 85 ची सरासरी असणारा खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा

IND vs SA : 85 ची सरासरी असणारा खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) टेस्ट सीरिजमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्याची जागा 85 सरासरी असणारा बॅटर घेणार आहे.

     मुंबई, 22 डिसेंबर :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबर रोजी होणार आहे. सेच्युरिअनमध्ये होणारी ही टेस्ट जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या टेस्ट सीरिजपूर्वी रोहिीत शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला. रोहित ही सीरिज खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये मयंक अग्रवालवर  (Mayank Agarwal) भारतीय इनिंगची सुरूवात करण्याची मोठी जबाबदारी असेल. मयंक पहिल्या टेस्टसाठी जय्यत तयारी करत आहे. टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडच्या (Rahil Dravid) मार्गदर्शनाखाली मयंकनं विशेष प्रॅक्टीस केली. सेंच्युरिअन टेस्टपूर्वी बॅटींगमधील कमतरता दूर करण्याचा मयंकचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याने ट्रेनिंगमध्ये शॉर्ट बॉल आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलचा भरपूर सराव केला आहे. मयंकनं न्यूझीलंड विरुद्ध मुंबईत झालेल्या टेस्टमध्ये 150 आणि 62 रनची खेळी केली होती. या खेळीनंतरही त्याची दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये प्लेईंग 11 मधील जागा अनिश्चित होती. मात्र रोहित दुखापतग्रस्त झाल्यानं त्याला आता संधी मिळणार आहे, या संधीचा जास्तीत जास्त फायदा उठवण्याचा मयंकचा प्रयत्न असेल. IND vs SA: विराट-रोहित बॉलनंही मिळवून देणार टीम इंडियाला विजय, अश्विनपेक्षा चांगला रेकॉर्ड! 85 ची सरासरी मयंकचा दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध दमदार रेकॉर्ड आहे. त्याने आफ्रिकेविरुद्ध आजवर 3 टेस्टमध्ये 85 च्या सरासरीनं 340 रन काढले आहेत. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. जे त्यानं विशाखापट्टणम इथं लागवले होते. अर्थात त्याला दक्षिण आफ्रिकेतील फास्ट पिचवर खेळण्याचा अनुभव नाही. कारण, त्याचा हा पहिलाच दक्षिण आफ्रिका दौरा आहे. मयंकची टेस्ट क्रिकेटमधील ओपनर म्हणून सरासरी 50 आहे. त्याने आजवर 25 इनिंगमध्ये 1247 रन केले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Rohit sharma, Team india

    पुढील बातम्या