मुंबई, 6 मार्च : ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) शुक्रवारी निधन झालं. वॉर्नचं शुक्रवारी थायलंडमध्ये हार्ट अटॅकनं निधन झालं. त्याच्या धक्कादायक निधनाचा क्रिकेट विश्वातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन आणि वॉर्नचा सहकारी रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) वॉर्नला श्रद्धांजली वाहताना रिकी पॉन्टिंग चांगलाच भावुक झाला. त्याला अश्रू आवरता आले नाहीत. ‘ही घटना ऐकल्यापासून मी सुन्न आहे. मला अजिबात विश्वास बसत नाही, असं सांगत पॉन्टिंग म्हणाला की, ‘मला देखील सर्वांप्रमाणे मोठा धक्का बसला आहे. मी सकाळी उठलल्यावर हा मेसेज वाचला आणि मला मोठा धक्का बसला. मला मुलीला नेटबॉलसाठी घेऊन जायचं होतं. ही बातमी समजल्यावर मला विश्वास बसत नव्हता. मला या घटनेची खात्री होण्यासाठी काही तास लागले. तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होता. आम्ही अनेक संस्मरणीय प्रसंग एकत्र घालवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा प्रत्येक तरूण क्रिकेटपटूला त्याच्यासारखा बोल्ड लेग स्पिनर व्हायचं होतं. त्याच्यापेक्षा आव्हानात्मक बॉलर मी पाहिला नाही. त्याने स्पिन बॉलिंगमध्ये क्रांती केली केली.’ असे पॉन्टिंगने सांगितले.
वॉर्नच्या मृत्यूमागे घातपात असल्याची शक्यता थायलंड पोलिसांनी फेटाळून लावली आहे. शेन वॉर्नला त्याच्या मित्रांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. पण, तिथे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले, नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.शेन वॉर्न त्याच्या मित्रांसह थायलंडला आला होता. शुक्रवारी दुपारी ते विश्रांती घेत होते. बराचवेळ झाल्यानं शेनच्या चार मित्रांपैकी एकानं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानं प्रतिसाद दिला नाही. मेडिकल सपोर्ट मिळण्यापूर्वी त्याच्या मित्रांनी सुमारे 20 मिनिटं त्याला सीपीआर (CPR) देऊन शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला थाई इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये (Thai International Hospital) नेण्यात आलं. प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. IND vs SL : जडेजाचं शेन वॉर्नशी होतं खास नातं, हर्षा भोगलेंनी सांगितला 14 वर्षांपूर्वीचा किस्सा ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या (MCG) बाहेर वॉर्नचा मोठा पुतळा उभा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन फॅन्सला वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी तिथं मोठी गर्दी केली होती. मेलबर्नच्या एमसीजी स्टेडियममधील स्टँडला शेन वॉर्नचं नाव देण्याची घोषणा ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’नं केली आहे.

)







