जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs PAK : वर्ल्ड कपमधील मॅचपूर्वी 'हा' बॉलर दबावात होता, आफ्रिदीचा खुलासा

IND vs PAK : वर्ल्ड कपमधील मॅचपूर्वी 'हा' बॉलर दबावात होता, आफ्रिदीचा खुलासा

IND vs PAK : वर्ल्ड कपमधील मॅचपूर्वी 'हा' बॉलर दबावात होता, आफ्रिदीचा खुलासा

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला. या मॅचपूर्वी एक बॉलर दबावात होता, असा खुलासा पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं (Shahid Afridi) केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 डिसेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला. आयसीसी  वर्ल्ड कपमध्ये सलग 12 पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्ताननं हा विजय मिळवला. पाकिस्तानच्या या विजयात फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीचे (Shaheen Afridi) मोलाचे योगदान होते. त्याने रोहित शर्मा (0), केएल राहुल (3) आणि विराट कोहली (57) या 3 प्रमुख भारतीय बॅटर्सना आऊट केले. जबरदस्त बॉलिंगमुळे ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरलेला शाहिन या मॅचपूर्वी दबावात होता. शाहिनचा भावी सासरा आणि पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीने (Shashid Afridi) हा खुलासा केला आहे. पाकिस्तानमधील ‘समा टीव्ही’शी बोलताना आफ्रिदीनं  भारत-पाकिस्तान मॅचच्या आधी काय झालं याचा खुलासा केला आहे. ‘भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी शाहिननं मला व्हिडीओ कॉल केला होता. मी दबावात असल्याचं त्याने मला सांगितलं. आम्ही जवळपास 11-12 मिनिटं चर्चा केली. परमेश्वरानं तुला खेळण्याची संधी दिली आहे. तू विकेट्स मिळव आणि हिरो हो, हा सल्ला मी त्याला दिला. परमेश्वराच्या कृपेनं शाहिननं तसंच केलं.’ असं आफ्रिदीनं सांगितलं. IND vs PAK : टीम इंडियाची टॉप ऑर्डर गडगडली, एकाच बॉलरनं दिले जोरदार धक्के शाहिद आफ्रिदीनं यावेळी भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच दरम्याने त्याच्या आठवणी देखील सांगितल्या. या मॅचपूर्वी आम्हाला रात्री नीट झोप लागत नसे. काही खेळाडू एका झोनमध्ये जात. मी मात्र कायम भारत-पाकिस्तान मॅच कधी होईल याची वाट पाहात असे. दोन्ही टीममध्ये या मॅचबद्दल एक वेगळीच इर्षा आहे. त्यामुळे ज्यांना क्रिकेट आवडत नाही, अशी मंडळीही त्या दिवशी टीव्हीसमोर ठाण मांडून असतात,’ असे आफ्रिदीने स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात