मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs PAK : खराब सुरुवातीनंतर टीम इंडियाचं जोरदार कमबॅक, पाकिस्तानसमोर आव्हानात्मक टार्गेट

IND vs PAK : खराब सुरुवातीनंतर टीम इंडियाचं जोरदार कमबॅक, पाकिस्तानसमोर आव्हानात्मक टार्गेट

 भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील अंडर 19 आशिया कप (Under 19 Asia Cup) स्पर्धेतील मॅचमध्ये टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतर कमबॅक केले.

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील अंडर 19 आशिया कप (Under 19 Asia Cup) स्पर्धेतील मॅचमध्ये टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतर कमबॅक केले.

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील अंडर 19 आशिया कप (Under 19 Asia Cup) स्पर्धेतील मॅचमध्ये टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतर कमबॅक केले.

मुंबई, 25 डिसेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील मॅचमध्ये टीम इंडियाने खराब सुरुवातीनंतर कमबॅक केले. आराध्य यादव (Aaradhya Yadav) आणि राजवर्धन हांगर्गेकर यांच्या खेळामुळे टीम इंडियानं या मॅचमध्ये कमबॅक केले

पाकिस्तान विरुद्धच्या या मॅचमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली होती.  3 आऊट 14 आणि 5 आऊट 96 या नाजूक स्थितीतून आराध्यनं इनिंग सावरली. त्यानं 50 रन केले. तर राजवर्धननं फक्त 20 बॉलमध्ये  33 रन केल्यानं टीम इंडियाला पाकिस्तानसमोर विजयासाठी 238 रनचं टार्गेट ठेवता आले.

दुबईत सुरू असलेल्या या मॅचमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन कासिम अक्रम (Qasim Akram) याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्सनी कॅप्टनचा हा निर्णय सार्थ ठरवत टीम इंडियाला झटपट धक्के दिले.

टीम इंडियानं जेमतेम खातं उघडलं होतं त्यावेळी अंगकृष रघुवंशी आऊट झाला. त्यानंतर 14 रनवर स्कोअर पोहचल्यावर भारतीय टीमला लागोपाठ दोन धक्के बसले. सर्वप्रथम शेक रशीद 6 रन काढून आऊट झाला. त्यापाठोपाठ कॅप्टन यश धुल (Yash Dhull) भोपळाही न फोडता आऊट झाल्यानं टीम इंडियाला तिसरा धक्का बसला.

पाकिस्तानच्या जीशान जमीरनं टीम इंडियाला हे सर्व धक्के दिले. त्याने फक्त 9 बॉलमध्ये टीम इंडियाचे 3 प्रमुख बॅटर आऊट केले.  3 आऊट 14 या नाजूक परिस्थितीतून भारतीय टीमनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला.पण 100 रनचा टप्पा ओलांडण्यापूर्वीच निम्मी टीम आऊट झाली आहे. ओपनिंगला आलेल्या हरनूर सिंहनं एक बाजू लावून धरली होती, पण तो देखील 46 रन काढून आऊट झाला. भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही या स्पर्धेतील पहिली मॅच जिंकली आहे. ग्रुपमध्ये अव्वल राहण्यासाठी दोन्ही टीमना ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. पाकिस्तानकडून जीशान जमीर सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 60 रन देत 5 विकेट्स घेतल्या.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs Pakistan