लाहोर, 23 मे: संपूर्ण पाकिस्तानमध्ये सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेकांची दांडी गूल करणारा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याच्या लग्नाची ही चर्चा आहे. शाहिन सध्या 20 वर्षांचा आहे. त्याला पाकिस्तानच्या क्रिकेटचं भविष्य मानले जाते. मैदामात अनेकांची दांडी उडवणारा शाहिनची विकेट पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) मुलगी अक्साने घेतली आहे. दोन क्रिकेटपटूच्या परिवारामध्ये होणाऱ्या या लग्नाबाबत शाहिनसह अनेकांनी यावर यापूर्वीच वक्तव्य केले होते. फक्त शाहिद आफ्रिदीनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता अखेर आफ्रिदीनंही या लग्नावर शिक्कामोर्तब केले आहे.
कधी होणार लग्न?
पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला बोलताना आफ्रिदीनं या लग्नाबाबत माहिती दिली. शाहिन आफ्रिदीच्या वडिलांनी या लग्नाबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव आम्ही स्वीकारला असल्याचं आफ्रिदीने सांगितले. हा प्रस्ताव मान्य करण्यापूर्वी शाहिनचं आपल्या मुलीशी काहीही नातं नव्हतं, असंही आफ्रिदीनं स्पष्ट केलं.
"आमच्या दोन्ही परिवारामध्ये मैत्री आहे. या मैत्रीचं रुपांतर नात्यामध्ये करण्याची त्यांची इच्छा होती. शाहिन आणि अक्सा हे दोघेही सध्या करियरवर लक्ष देत आहेत. अक्साला डॉक्टर व्हायचे आहे. ती पुढील शिक्षण पाकिस्तानात घेणार की इंग्लंडमध्ये यावर अजून निर्णय झालेला नाही. दोन वर्षांनंतर हे लग्न होऊ शकते,'' असे आफ्रिदीने सांगितले.
फॅन्सनी विचारला कोहली आणि धोनीबद्दल प्रश्न, सूर्यकुमारचे उत्तर वाचून वाटेल अभिमान
PSL मध्ये खेळतात जावाई आणि सासरे
शाहिन आफ्रिदी आता शाहिद आफ्रिदीचा जावाई होणार आहे. हे दोघेही सध्या पाकिस्तान सुपर लिगमध्ये खेळतात. शाहिन आफ्रिदी लाहोर कलंदर्स तर शाहिद आफ्रिदी मुलतान सुलतान या टीमचा सदस्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Pakistan, Shahid Afridi, Shahid afridi statement