मुंबई, 23 मे : आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या घरीच विश्रांती घेत आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन असल्याने सूर्याला मैदानात जाऊन क्रिकेटचा सराव करणे देखील शक्य नाही. या वेळेचा उपयोग करण्यासाठी सूर्यकुमारने सोशल मीडियावरुन फॅन्सशी संवाद साधला. त्याने यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) या टीम इंडियाच्या आजी-माजी कॅप्टनबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली. सूर्यकुमारनं इन्स्टाग्रामवर फॅन्ससाठी प्रश्न-उत्तराचे सेशन ठेवले होते. त्यावेळी त्याने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. एका फॅनने त्याला विराट आणि धोनीचं एका शब्दात वर्णन करायला सांगितले. त्याला उत्तर देताना सूर्यकुमारनं धोनीचं महान (legend) तर कोहलीसाठी प्रेरणा (inspiration) या शब्दात वर्णन केले.
इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये सूर्यकुमारची निवड झालेली नाही. श्रीलंकेत जुलै महिन्यात होणाऱ्या वन-डे आणि टी-20 मालिकेसाठी त्याची निवड निश्चित आहे. सूर्यानं इंग्लंड विरुद्ध झालेल्या T20 मालिकेतील दुसऱ्या मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिसऱ्या मॅचमध्ये त्याला वगळण्यात आले होते. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या मॅचमध्ये त्याला पुन्हा संधी मिळाली. यावेळी सूर्याने दमदार बॅटींग केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची वन-डे टीममध्येही निवड झाली. पण, वन-डे मालिकेत त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नाही. विराट कोहलीच्या मदतीनंतरही वाचला नाही जीव, क्रीडा विश्वातून दु:खद बातमी सूर्या टीम इंडियामध्ये नवा असला तरी श्रीलंका दौऱ्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या या युवा टीमचा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) असण्याची शक्यता आहे.