मुंबई, 4 जुलै: दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (South Africa vs West Indies) यांच्यामध्ये शनिवारी झालेली पाचवी आणि शेवटची टी20 आफ्रिकेनं 25 रननं जिंकली. या विजयाबरोबरच आफ्रिकेनं ही मालिका 3-2 या फरकानं जिंकली. या मालिकेतील पहिली टी20 वेस्ट इंडिजनं जिंकली. त्यानंतरच्या दोन दक्षिण आफ्रिकेनं जिंकल्या. वेस्ट इंडिजनं पुन्हा चौथी मॅच जिंकत बरोबरी साधली होती. अखेर पाचव्या आणि निर्णयाक मॅचमध्ये आफ्रिकेनं बाजी मारत मालिका जिंकली. शनिवारी झालेल्या या मॅचमध्ये आफ्रिकेच्या विजयापेक्षा अंपायरच्या धक्कादायक निर्णयाचीच जास्त चर्चा होती. दक्षिण आफ्रिकेच्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. काय घडला प्रसंग? दक्षिण आफ्रिकेची बॅटींग सुरु असताना 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हा प्रकार घडला. वेस्ट इंडिजच्या ओबेड मकॉय (Obed McCoy) आफ्रिकेच्या विआन मल्डरला (Wiann Mulder) हा बॉल टाकला होता. मकॉयनं टाकलेला स्लो शॉर्ट बॉल मल्डरच्या हेल्मेटच्याही वर होता. मल्डरनं त्यावर पूल मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मैदानातील अंपायरनं हा वाईड बॉल दिला नाही. थर्ड अंपायरनंही त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही. दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑल राऊंडर एल्बी मॉर्केल (Alibe Morkel) याने या बॉलचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
🤷🏻♂️🤔 pic.twitter.com/7oQEyylKn7
— Albie Morkel (@albiemorkel) July 3, 2021
हा वाईड बॉल कसा नाही? असा प्रश्न दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेननं (Dale Steyn) विचारला आहे. माजी कॅप्टन एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) यानं देखील हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
How on earth is that not a wide???!!!!
— Dale Steyn (@DaleSteyn62) July 3, 2021
Shocker
— AB de Villiers (@ABdeVilliers17) July 3, 2021
भारतामध्ये होणार जगातील तिसरे मोठे क्रिकेट स्टेडियम, 650 कोटींच्या बजेटमध्ये ‘या’ खास गोष्टींचा समावेश दक्षिण आफ्रिकेनं पाचवी मॅच 25 रननं जिंकली. त्यामुळे अंपायरच्या या चुकीचा मॅचच्या निर्णयावर परिणाम झाला नाही.पण, उघड्या डोळ्यानं दिसणारी ही चूक अंपायरला सर्व प्रकारचे तंत्रज्ञान मदतीला असूनही कशी दिसली नाही? असा प्रश्न क्रिकेट फॅन्स आता विचारत आहेत.