Home /News /sport /

भारतामध्ये होणार जगातील तिसरे मोठे क्रिकेट स्टेडियम, 650 कोटींच्या बजेटमध्ये ‘या’ खास गोष्टींचा समावेश

भारतामध्ये होणार जगातील तिसरे मोठे क्रिकेट स्टेडियम, 650 कोटींच्या बजेटमध्ये ‘या’ खास गोष्टींचा समावेश

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमध्ये बांधल्यानंतर आणखी एका भव्य स्टेडियमची तयारी सुरु झाली आहे. हे स्टेडियम देखील भारतामध्येच होणार आहे.

    मुंबई, 4 एप्रिल : जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमध्ये बांधल्यानंतर आणखी एका भव्य स्टेडियमची तयारी सुरु झाली आहे. हे स्टेडियम देखील भारतामध्येच होणार आहे. गुलाबी शहर (Pink City) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमध्ये (Jaipur) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे भव्य स्टेडियम बांधण्यात येणार आहे. जयपूरमध्ये नवे स्टेडियम होणार अशी घोषणा राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे (RCA) प्रमुख वैभव गहलोत यांनी यापूर्वीच केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर 2 जुलै रोजी जयपूर शहर विकास प्राधिकरणाने राजस्थान क्रिकेट असोसिएशनला नव्या स्टेडियमसाठी जमीन दिली आहे. जयपूरमध्ये बांधण्यात येणाऱ्या या नव्या स्टेडियमची प्रेक्षक क्षमताल 75 हजार आहे. याचे काम दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 45 हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम बांधण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात याची क्षमता 30 हजारानं वाढवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 300 कोटी खर्च अपेक्षित आहे. यामध्ये राजस्थान क्रिकेट असोसिएशन 100 कोटी रक्कम देणार असून कॉर्पोरेट बॉक्सच्या माध्यमातून 90 कोटी गोळा केले जाणार आहेत. बीसीसीआय 100 कोटींचे कर्ज देणार आहे. 100 एकर जागेचा वापर जयपूर-दिल्ली महामार्गावर हे नवे स्टेडियम उभारण्यात येईल. येत्या 45 दिवसांमध्ये याचे काम सुरु होईल. संपूर्ण स्टेडियम बांधण्यासाठी पाच ते सहा वर्ष लागणार आहेत. तर अडीच ते तीन वर्षांमध्ये पहिला टप्पा पूर्ण होईल. एकूण 100 एकर परिसरात हे स्टेडियम बांधण्यात येणार आहे. या स्टेडियममध्ये इंग्लंडमधील साऊथम्पटनमधील (Southampton) स्टेडियमसारख्या सर्व सुविधा असतील. त्यात 2 प्रॅक्टीस ग्राऊंड, क्लब हाऊस, हॉटेल, जिम, क्रिकेट अकादमी, हॉस्टेल या सुविधा असतील. भविष्यात बायो-बबल स्टेडियम म्हणून याचा वापर करण्यात येणार आहे. मिताली राज बनली नंबर 1, वाचा टीम इंडियाच्या रन मशिनचे सर्व रेकॉर्ड्स अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. त्याची प्रेक्षक क्षमता 1 लाख 10 हजार आहे. मेलबर्नमधील एमसीजी हे दुसऱ्या क्रमांकाचे स्टेडियम असून त्याची क्षमता 1 लाख आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Jaipur, Rajasthan

    पुढील बातम्या