जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ‘त्याला कुणी तरी सांगा...’ रितिकानं केलं रोहित शर्माला ट्रोल

‘त्याला कुणी तरी सांगा...’ रितिकानं केलं रोहित शर्माला ट्रोल

‘त्याला कुणी तरी सांगा...’ रितिकानं केलं रोहित शर्माला ट्रोल

रोहितची (Rohit Sharma) पत्नी रितिका सजदेहनं (Ritika Sajdeh) इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये रोहितनं काळा गॉगल घातला असून तो एकदम गंभीर आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 3 जुलै : टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात आक्रमक बॅटींगसाठी प्रसिद्ध आहे. मैदानाच्या बाहेर मात्र तो सर्वांची फिरकी घेण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या फोटोंमध्ये रोहितचा चेहरा नेहमी हसरा असतो. रोहित सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेतोय. रोहितची पत्नी रितिका सजदेहनं (Ritika Sajdeh) इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये रोहितनं काळा गॉगल घातला असून तो एकदम गंभीर आहे. रोहितचा हा सहसा न दिसणारा गंभीर लूक पाहून रितिकाला त्याला ट्रोल केल्याशिवाय राहवलं नाही. ‘कुणीतरी त्याला सांगा की हसणं हे कूल असतं’ असं मजेदार कॅप्शन रितिकानं या फोटोला दिलं आहे.  रोहितनं अजून तरी रितिकाच्या या प्रतिक्रियेला उत्तर दिलेलं नाही, पण त्यांचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.

News18

रोहितची मागितली होती माफी या सुट्टीच्या दरम्यान रोहितची पत्नी रितिकानं त्याची सोशल मीडियावर माफी मागितली होती. रोहित शर्मापेक्षा देखील गोड कुणीतरी आपल्याला भेटल्याचा दावा रितिकानं केला. रितिकानं तिच्या इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहलंय, “सॉरी रोहित, तू आता सेटवरील सर्वात गोड राहिलेला नाहीस.” रितिकानं ही पोस्ट गंभीरपणे नाही तर मजेत लिहिली आहे. कारण, या पोस्टमध्ये तिने सर्वात गोड कोण आहे ते देखील सांगितलं आहे. रितिकाच्या मते रोहित नाही तर एक कुत्रा सध्या सर्वात गोड आहे. T20 World Cup मध्ये टीम इंडियाला आपल्याच ‘कॅप्टन’ला बाहेर बसवावं लागणार! WTC Final मध्ये रोहित फ्लॉप न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) रोहित शर्माला दोन्ही इनिंगमध्ये चांगली सुरुवात मिळाली होती. त्यानंतर त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो पहिल्या इनिंगमध्ये 34 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 30 रन काढून आऊट झाला. टीम इंडियानं फायनल मॅच 8 विकेट्सनं गमावली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात