मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup मध्ये टीम इंडियाला आपल्याच 'कॅप्टन'ला बाहेर बसवावं लागणार!

T20 World Cup मध्ये टीम इंडियाला आपल्याच 'कॅप्टन'ला बाहेर बसवावं लागणार!

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे, त्याआधी भारतीय टीम श्रीलंकेमध्ये (India vs Sri Lanka) अखेरची टी-20 सीरिज होणार आहे. श्रीलंकेतल्या या सीरिजसाठी शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 2 जुलै : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे, त्याआधी भारतीय टीम श्रीलंकेमध्ये (India vs Sri Lanka) अखेरची टी-20 सीरिज होणार आहे. श्रीलंकेतल्या या सीरिजसाठी शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये (India vs England) असल्यामुळे या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर राहुल द्रविड (Rahul Dravid) याला टीमचा प्रशिक्षक करण्यात आलं आहे. शिखर धवनला या सीरिजसाठी कर्णधार बनवलं असलं, तरी वर्ल्ड कपमध्ये मात्र त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं शक्य नसल्याचं मत, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) मांडलं आहे.

'टीम शिखर धवनकडे बघत नाहीये, कारण मागच्यावेळी जेव्हा त्याला टी-20 सामन्यात संधी दिली, तेव्हा एका मॅचनंतरच बाहेर करण्यात आलं. पुढच्या चारही मॅच तो बेंचवर बसून होता,' असं आकाश चोप्रा म्हणाला. वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमधली पहिली मॅच धवन खेळला, पण या सामन्यात फ्लॉप गेल्यानंतर केएल राहुल ओपनिंगला आला.

'श्रीलंका दौऱ्यात आणि उरलेल्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये शिखर धवनने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली, तरच च्याचा टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये विचार होऊ शकतो,' अशी प्रतिक्रियाही आकाश चोप्राने दिली.

शिखर धवनला टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. 63 टी-20 इनिंगमध्ये त्याने 27.88 च्या सरासरीने 1,673 रन केले. धवनचा स्ट्राईक रेटही 127.41 आहे. तर केएल राहुलने 45 टी-20 मध्ये 39.92 च्या सरासरीने 1,557 रन केले, यात 2 शतकांचा समावेश आहे. राहुलचा स्ट्राईक रेटही 142.19 आहे. याच कारणामुळे राहुलला धवनऐवजी टी-20 मध्ये संधी दिली जाते.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Shikhar dhawan, T20 world cup, Team india