मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: संजू सॅमसननं तोडलं राजस्थानशी नातं! 'या' टीममधील जागा पक्की?

IPL 2022: संजू सॅमसननं तोडलं राजस्थानशी नातं! 'या' टीममधील जागा पक्की?

आयपीएल 2022 (IPL 2022) साठी खेळाडू रिटेन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया सुरू होताच राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Roylas) कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 नोव्हेंबर: आयपीएल 2022 (IPL 2022) साठी खेळाडू रिटेन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयपीएलमधील जुन्या 8 टीमना जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आहे. ही प्रक्रिया सुरू होताच राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Roylas) कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) आणि फ्रँचायझीमधील नातं आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही.

'इनसाईड स्पोर्ट्स' नं दिलेल्या वृत्तानुसार संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची नाराज आहे. त्यानं टीमला सोशल मीडिया अकांऊटवरुन अनफॉलो केलं आहे. याबाबत राजस्थानचं टीम मॅनेजमेंट किंवा संजूनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, संजूनं टीमला अनफॉलो का केलं? याचं कारण राजस्थानच्या मॅनेजमेंटला माहिती नाही. संजूला रिटेन करण्याची राजस्थानची इच्छा आहे. पण, संजूला यंदा टीमकडून खेळायचं नाही.

संजूनं राजस्थान रॉयल्सला रामराम केल्यास तो महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सकडून खेळू शकतो. चेन्नईला धोनीचा वारसदार म्हणून चांगल्या विकेट किपर-बॅटरची गरज आहे. चेन्नईकडून गेल्या दोन वर्षांपासून संजूचा पाठपुरावा केला जात आहे. संजूनं ही ऑफर स्विकारल्यास पुढील सिझनपूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) चेन्नईची टीम संजूला खरेदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करू शकते.

IIT, IIM मध्ये न जाता क्रिकेटच्या मैदानात उतरला, IPL गाजवल्यानंतर आता थेट टीम इंडियात निवड

राजस्थानचा यशस्वी खेळाडू

संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सच्या इतिहासात अजिंक्य रहाणे नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॅटर आहे. त्यानं राजस्थानडून 99 मॅचमध्ये 30.38 ची सरासरी आणि 135.59 च्या स्ट्राईक रेटनं 2583 रन काढले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थानकडून प्रत्येक आयपीएल सिझनमध्ये त्यानं 300 पेक्षा जास्त रन काढले आहेत. यावर्षीच्या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) संजू राजस्थानचा कॅप्टन होता. राजस्थानची टीम 'प्ले ऑफ'साठी क्वालिफाय करू शकली नाही. पण, संजूची बॅट चांगलीच तळपली. त्यानं 1 शतकासह 484 रन केले.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, Rajasthan Royals, Sanju samson