• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! बेन स्टोक्सने घेतला 'हा' निर्णय

IPL 2021: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! बेन स्टोक्सने घेतला 'हा' निर्णय

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धेचा 14 सिझन (IPL 2021) अचानक अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील तारखा जाहीर होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) धक्का बसला आहे.

 • Share this:
  लंडन, 13 मे : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) अचानक अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला. या आयपीएलमधील 60 पैकी 31 मॅच अजून बाकी आहेत. या मॅचसाठी विंडो शोधण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न सुरु आहे. या स्पर्धेच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सला धक्का बसला आहे.  इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) यानं त्याच्या दुखापतीबात नवी माहिती दिली आहे. या दुखापतीमधून पूर्णपणे बरा झाल्यानंतरही आयपीएल स्पर्धेतील उर्वरित मॅच आपण खेळू असं वाटत नाही, असं स्टोक्सनं स्पष्ट केलं आहे. स्टोक्सनं 'डेली मिरर' मध्ये लिहिलेल्या कॉलमध्ये म्हंटलं आहे की, "आयपीएल स्पर्धा पुन्हा कधी सुरु होईल, हे आम्हाला माहिती नाही. ईसीबीनं इंग्लंड खेळाडू या स्पर्धेत खेळं अवघड असल्याचं सांगितलं आहे. मला माहिती नाही की मी मैदानावर कधी परतेल. यासाठी साधारण नऊ आठवडे लागू शकतात. राजस्थान रॉयल्सचा निरोप घेणं हे अवघड होतं. कारण, मला इतक्या लवकर परत जायचं नव्हतं. त्यानंतर स्पर्धाच स्थगित झाली आणि सर्वजण परत आले आहेत. भारत या कठीण परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे." असं स्टोक्सनं म्हंटलं आहे. न्यूझीलंडचे खेळाडू देखील आऊट इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) त्यांचे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात नसतील असे संकेत दिले आहेत.  त्यापाठोपाठ न्यूझीलंडचे खेळाडू देखील या आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमी असल्याचं वृत्त आहे. न्यूझीलंडची टीम सप्टेंबरमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन वन-डे आणि तीन T20 मॅचची ही सीरिज आहे. ही सीरिज फ्यूचर टूर प्रोग्रॅमचा (FTP) भाग आहे.  ती रद्द किंवा स्थगित केली जाऊ शकत नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धेचा उत्तरार्ध सप्टेंबरमध्ये झाला तर न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत.
  Published by:News18 Desk
  First published: