मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : CSK चा कॅप्टन या सिझनमध्येच बदलणार, 3 वेळा विजेतेपद पटकावणारा घेणार धोनीची जागा!

IPL 2022 : CSK चा कॅप्टन या सिझनमध्येच बदलणार, 3 वेळा विजेतेपद पटकावणारा घेणार धोनीची जागा!

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेची तयारी आता सुरू झाली आहे. या स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) टीममधून एक मोठी बातमी समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 जानेवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेची तयारी आता सुरू झाली आहे. पुढील महिन्यात यासाठी मेगा ऑक्शन (IPL 2022) होणार आहे. या ऑक्शननंतर सर्व टीमचे चित्र स्पष्ट होईल. सध्या सर्व टीम या ऑक्शनची तयारी करत आहेत. चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) ही स्पर्धा खास असणार आहे. चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचे (MS Dhoni) हे शेवटचे आयपीएल असेल.

चेन्नईमध्ये आयपीएलचा सामना खेळून निवृत्त होणार असल्याचं धोनीने यापूर्वीच जाहीर केले आहे. मागील दोन सिझन धोनीला ही संधी मिळाली नाही. यंदा संपूर्ण सिझन भारतामध्ये होणार असल्यानं धोनीला चेन्नईत सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. सीएसकेने धोनीला यंदा रिटेन केले असून तोच या टीमचा कॅप्टन असेल, असा सर्वांचा अंदाज आहे. पण काही मीडिया रिपोर्टनुसार या सिझनमध्ये सीएसकेचा कॅप्टन बदलण्याची शक्यता आहे.

सीएसकेचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या सिझनमध्येच सीएसकेचा कॅप्टन होईल असा अंदाज आहे. जडेजाला सीएसकेने धोनीपेक्षा जास्त किंमत देऊन रिटेन केले आहे. राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनचे विजेतेपद पटाकावले होते. त्या विजेतेपदामध्ये जडेजाचे मोलाचे योगदान होते. तो गेल्या 10 वर्षांपासून सीएसके टीमचा सदस्य आहे. त्याने सीएसकेकडून दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली असून तो टीमचा मुख्य ऑल राऊंडर आहे.

धोनी याच सिझनपासून त्याला कॅप्टनसीची जबाबदारी देईल असा अंदाज आहे. धोनी संपूर्ण सिझन खेळणार की चेन्नईमधील एक दोन सामने खेळून निवृत्त होणार हे अद्याप समजलेलं नाही. मात्र पुढील 10 वर्षांचा विचार करुन आता टीमची उभारणी करावी लागणार आहे, असे वक्तव्य धोनीने आयपीएल विजेतेपदानंतर केले होते. त्यामुळेच भविष्याचा विचार करून सीएसके मॅनेजमेंट याच सिझनमध्ये धोनीच्या उपस्थितीत जडेजाला कॅप्टन करू शकते अशी सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.

IND vs SA : 'त्यांनी आधीच पराभव मान्य केला होता,' गावसकर टीम इंडियावर बरसले

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Ravindra jadeja