जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : 'त्यांनी आधीच पराभव मान्य केला होता,' गावसकर टीम इंडियावर बरसले

IND vs SA : 'त्यांनी आधीच पराभव मान्य केला होता,' गावसकर टीम इंडियावर बरसले

IND vs SA : 'त्यांनी आधीच पराभव मान्य केला होता,' गावसकर टीम इंडियावर बरसले

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केपटाऊन टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं वापरलेल्या डावपेचांवर जोरदार टीका केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जानेवारी : भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केपटाऊन टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं वापरलेल्या डावपेचांवर जोरदार टीका केली आहे. चौथ्या दिवशी लंच झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 41 रन आवश्यक होते. तर टीम इंडियाला 7 विकेट्सची गरज होती. लंचनंतर दक्षिण आफ्रिकेनं अगदी आरामात उर्वरित रन पूर्ण केले. टीम इंडियानं मॅच संपण्यापूर्वीच पराभव मान्य केला होता, अशी टीका गावसकर यांनी केली आहे. ‘शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांनी लंचनंतर बॉलिंग का केली नाही, हे रहस्य आहे. आपण मॅच जिंकणार नाही, हे टीम इंडियाने जवळपास मान्य केले होते, असेच वाटले. अश्विनला योग्य ठिकाणी फिल्डिंगला उभे केले नव्हते. तिथं एक रन आरामात येत होते. पाच फिल्डर डिपमध्ये उभे करून बॅटरला आव्हान द्यायला हवे होते. त्यांना आऊट करण्याची ती एकमेव संधी होती,’ असे गावसकर यांनी सांगितले. गावसकर यांनी यावेळी ही सीरिज जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमची प्रशंसा केली. बॅटींगला मदत न करणाऱ्या पिचवर त्यांनी धैर्यानं खेळ केला, अशी प्रशंसा गावसकर यांनी केली. विशेषत: जोहान्सबर्ग टेस्टमधील आफ्रिकेच्या बॅटींगचे त्यांनी विशे। कौतुक केले. जीव धोक्यात घालून केला 8300 किमी प्रवास, अफगाण क्रिकेटपटूची गोष्ट वाचून डोळ्यात येईल पाणी केपटाऊनमध्ये झालेल्या निर्णायक टेस्टच्या चौथ्या दिवशी भारताचा 7 विकेटने पराभव झाला. याचसोबत दक्षिण आफ्रिकेने सीरिजही 2-1 ने जिंकली. यामुळे 30 वर्षांनंतरही भारताचं दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकण्याचं स्वप्न अधूरं राहिलं. भारताने दिलेल्या 212 रनच्या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने अगदी सहज केला आहे. भारताने दिलेलं हे आव्हान आफ्रिकेने 7 विकेट राखून पूर्ण केलं. टेम्बा बऊमा 32 रनवर नाबाद तर रस्सी व्हॅन डर डुसेन 41 रनवर नाबाद राहिले. आफ्रिकेकडून पीटरसनने सर्वाधिक 82 रन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात