जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मैदानातली ‘ही’ एक चूक, लगेच चढतो रवी शास्त्रींचा पारा!

मैदानातली ‘ही’ एक चूक, लगेच चढतो रवी शास्त्रींचा पारा!

मैदानातली ‘ही’ एक चूक, लगेच चढतो रवी शास्त्रींचा पारा!

टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख निर्माण करुन देण्यात रवी शास्त्रींची (Ravi Shastri) मोठी भूमिका आहे. भारतीय क्रिकेट टीमचे बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) यांनी नुकताच शास्त्रींबाबत एक खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 जानेवारी : विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख निर्माण करुन देण्यात रवी शास्त्रींची (Ravi Shastri) मोठी भूमिका आहे. शास्त्रींच्या मुख्य मार्गदर्शनाखाली भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा टेस्ट सीरिज जिंकत इतिहास घडवला आहे. भारतीय क्रिकेट टीमचे बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) यांनी नुकताच शास्त्रींबाबत एक खुलासा केला आहे. रवी शास्त्री यांच्या रागाचा पारा ड्रेसिंग रुममध्ये का वाढला होता, याचं कारण त्यांनी सांगितलं आहे. काय आहे कारण? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS)  यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये भारतीय बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीमध्ये बॉलिंग कोच भरत अरुण यांची मोठी भूमिका होती. ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सना ऑफ साईडला खेळण्यास भाग पाडावं असा सल्ला शास्त्री यांनी अरुण यांना दिला होता. भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) याच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुण यांनी ही माहिती दिली आहे.

(वाचा -  IND vs AUS : त्या दोघांवर विश्वास होता, पुजाराने सांगितलं संथ खेळण्याचं सीक्रेट )

“मॅचच्या दरम्यान कोणत्याही भारतीय बॉलर्सच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियन बॅट्समननं फोर मारलेलं रवी शास्त्रींना आवडत नाही. दोन फोर लगावल्यानंतर ड्रेसिंग रुममध्येच त्यांच्या रागाचा पारा चढतो,’’ असं अरुण यांनी सांगितलं. “रवी शास्त्री ड्रेसिंग रुममधून मॅच बघत. भारतीय बॉलर्सच्या बॉलिंगवर कुणी फोर किंवा सिक्स मारला तर त्यांना आवडत नसे. भारतीय बॉलर्सनी रन देऊ नये असं त्यांना वाटत असे. आपल्या बॉलर्सनी विकेट घ्याव्या आणि बॅट्समन्सनी रन करावे, हे शास्त्रींना वाटत,’’ असं अरुण यांनी स्पष्ट केलं.

(वाचा -  सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी, वाचा तब्येतीचे अपडेट्स )

कोहली आणि रहाणेतील फरक विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही कॅप्टनसोबत अरुण यांनी जवळून काम केलं आहे. “रहाणे हा शांत कॅप्टन आहे. त्यामुळेच त्याच्या कॅप्टनसीमध्ये खेळताना चुका झाल्या तरी बॉलर घाबरत नाही. कोहलीच्या बाबतीत नेमकं उलटं आहे. एखादा खराब बॉल टाकल्यानंतर कोहली नाराज होईल, असा बॉलर विचार करतात. मात्र कोहलीची नाराजी ही बॉलर्सवर नाही तर स्वत:च्या खेळावर असते. विराट कोहलीची आक्रमकताच भारतीय टीमची ऊर्जा आहे,’’ असं अरुण यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात