जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Sourav Ganguly Health: गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी, वाचा तब्येतीचे अपडेट्स

Sourav Ganguly Health: गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी, वाचा तब्येतीचे अपडेट्स

Sourav Ganguly Health: गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी, वाचा तब्येतीचे अपडेट्स

टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यावर गुरुवारी दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 29 जानेवारी : टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यावर गुरुवारी दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. गांगुलीला छातीमध्ये दुखत असल्यानं बुधवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.  ज्येष्ठ ऱ्हदयरोग तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी (Dr. Devi Shetty) यांनी गांगुलीच्या सर्व रिपोर्टची पडताळणी केल्यानंतर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याच्या धमन्यांमध्ये दोन स्टेन्ट देखील लावण्यात आले आहेत.

जाहिरात

यापूर्वी दोन जानेवारी रोजी गांगुलीला घरात जीममध्ये वर्क आऊट करताना हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी त्याला कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील त्याच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी गांगुली पाच दिवस हॉस्पिटलमध्ये होता. सात जानेवारी रोजी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. (वाचा -  IND VS ENG: लाखो चाहते टीव्हीवर नाही पाहू शकणार सामना ) गांगुलीवर उपचार करण्यासाठी 9 सदस्यांची टीम बनवण्यात आली होती. डॉक्टर देवी शेट्टी, आर.के.पांडा, सॅम्युअल मॅथ्यू, अश्विन मेहता आणि न्यूयॉर्कमधून शमिन के शर्मा यांचा सल्ला घेऊन गांगुलीच्या रक्तवाहिनीमध्ये स्टेन्ट टाकण्यात आली होती. यापूर्वी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गांगुलीला बुधवारी रात्री शांत झोप लागली होती. तसंच त्यानं सकाळी हलका नाश्ता देखील केला. गांगुलीचे सर्व रिपोर्ट्स पाहिल्यानंतरच त्याच्यावरील पुढील उपचाराचा निर्णय घेण्यात आला.

(वाचा -  IPL 2021 : या मुलाने जिंकलं ‘मुंबई इंडियन्स’चं मन, रोहितच्या टीममध्ये खेळणार! )

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सकाळी सौरव गांगुलीला फोन करून त्याच्या तब्येतीची माहिती घेतली. माकपचे नेते अशोक भट्टाचार्यही गांगुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात