Home /News /sport /

IND vs ENG: मँचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानंतर रवी शास्त्रींची आली पहिली प्रतिक्रिया! आरोपांबद्दल म्हणाले...

IND vs ENG: मँचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानंतर रवी शास्त्रींची आली पहिली प्रतिक्रिया! आरोपांबद्दल म्हणाले...

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातीस मँचेस्टर टेस्ट रद्द (Manchester Test Cancelled) होण्यासाठी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना जबाबदार धरलं जात आहे. इंग्लिश मीडिया, इसीबी तसंच भारतीय क्रितेट फॅन्स देखील यासाठी शास्त्रींना दोषी मानत आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातीस मँचेस्टर टेस्ट रद्द  (Manchester Test Cancelled) होण्यासाठी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना जबाबदार धरलं जात आहे. इंग्लिश मीडिया, इसीबी तसंच भारतीय क्रितेट फॅन्स देखील यासाठी शास्त्रींना दोषी मानत आहेत. आता शास्त्रींनी प्रश्नावरील मौन सोडलं असून आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. टीम इंडियात झालेल्या कोरोनाच्या उद्रेकाचा (Corona cases in Team India) पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाशी काहीही संबंध नव्हता, असं शास्त्रींनी स्पष्ट केलंय. लंडनमध्ये 1 सप्टेंबर रोजी रवी शास्त्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं मानलं जात आहे. शास्त्रींनी 'मिड-डे' शी बोलताना हा आरोप फेटाळला आहे. 'संपूर्ण ब्रिटन देश सध्या ओपन आहे. पहिल्या टेस्टपासूनच काहीही होऊ शकलं असतं. त्यामुळे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामुळे कोरोनाची लागण झाली आणि टेस्ट रद्द करावी लागली, हे खरं नाही.' असं शास्त्रींनी सांगितलं. चौथ्या टेस्टदरम्यान टीमचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sridhar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यानंतर पाचव्या टेस्टच्या एक दिवस आधी टीमचे फिजियो योगेश परमार (Yogesh Parmar) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं, त्यामुळे भारतीय खेळाडूंचा सराव रद्द करण्यात आला. यानंतर टॉसच्या काही तास आधी मॅचही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. T20 World Cup: 'रात्रीतून असं काय घडलं....', धोनीच्या निवडीवर जडेजाचा सवाल इंग्लंड दौरा यशस्वी रवी शास्त्रींनी यावेळी भारतीय टीमच्या इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीवरही मत व्यक्त केलं. 'बऱ्याच काळानंतर इंग्लंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट टीमनं या प्रकारचं प्रदर्शन केलं. कोरोनाच्या काळातही भारतीय टीमनं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात ज्या पद्धतीनं खेळ केला आहे, तसा खेळ क्वचितच कुणी केला असेल. तुम्ही खेळातील जाणकारांशी या विषयावर बातचित करु शकतात. मी देखील या ऐतिहासिक सीरिजचा साक्षीदार आहे,' असं शास्त्रींनी यावेळी सांगितलं.
    First published:

    Tags: India vs england, Ravi shastri

    पुढील बातम्या