मुंबई, 19 सप्टेंबर : टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) संपणार आहे. शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट टीमनं (Indian Cricket Team) विदेशात अनेक संस्मरणीय विजय मिळवले. ऑस्ट्रेलियात दोनदा टेस्ट सीरिज जिंकली. तसंच इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच जिंकल्या. या यशाचं श्रेय भारतीय टीमच्या फास्ट बॉलर्सना आहे. त्यांनी सातत्यानं चांगली कामगिरी करत विजय खेचून आणले. टीम इंडियाच्या यशाच फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचा मोठा वाटा आहे. तो आज क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीमचा प्रमुख बॉलर आहे. बुमराहनं 2013 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्याचवेळी त्याच्या बॉलिंगनं सर्वजण प्रभावित झाले होते. पण तो टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होईल, अशी अपेक्षा खूप कमी लोकांनी केली होती. या कमी लोकांमध्ये रवी शास्त्रींचा समावेश आहे. रवी शास्त्रींना बुमराहच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. दक्षिण आफ्रिकेत 2018 साली होणाऱ्या दौऱ्यापूर्वी त्याला जगासमोर आणू नका, अशी सूचना शास्त्री यांनी निवड समिती आणि विराट कोहलीला केली होती. ब्रिटीश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्रींनी याचा खुलासा केला आहे. टीम इंडियाच्या कोचपदी राहणार का? शास्त्रींनी दिलं उत्तर, सांगितली सर्वात मोठी इच्छा ‘मी कोच म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर विदेशात 20 विकेट्स कशा घेणार असा प्रश्न स्वत:ला विचारला. त्यावेळी माझ्या डोक्यात बुमराहचं नाव आलं. मला 4 फास्ट बॉलर्सची गरज होती. याची सुरुवात आम्ही दक्षिण आफ्रिकेत 2018 साली झालेल्या सीरिजमध्ये केली. ती सीरिज आम्ही 1-2 नं पराभूत झालो. केपटाऊन टेस्टमध्येच बुमराह जगासमोर यावा अशी माझी इच्छा होती. मी दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होण्यापूर्वी बुमराहाला भारतात टेस्ट क्रिकेट खेळवू नका, अशी सूचना निवड समिती आणि विराटला केली होती.’ असं शास्त्रींनी सांगितलं. IPL पूर्वी ख्रिस गेलनं पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यानं खळबळ, Tweet Viral बुमराहच्या 100 विकेट्स पूर्ण तीन वर्षांपूर्वी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बुमराहनं 24 टेस्टमध्ये 101 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध नुकत्याच झालेल्या सीरिजमध्ये बुमराहनं जोरदार कामगिरी केली. याच सीरिजमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 100 विकेट्स घेणारा तो भारतीय फास्ट बॉलर बनला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.