मुंबई, 18 सप्टेंबर : यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) टीम इंडियाचे हेड कोच म्हणून काम करणार नसल्याचं रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) यांनी स्पष्ट केलं आहे. विराट कोहलीनं टी20 टीमचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेच शास्त्रींनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मला हवं होतं, ते मी साध्य केलं असं सांगतानाच त्यांनी पद सोडण्यापूर्वीची सर्वात मोठी इच्छा देखील सांगितली. रवी शास्त्रींनी ‘द गार्डियन’ या ब्रिटीश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण टी20 वर्ल्ड कपनंतर पद सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. ’ मी सारं काही मिळवलं आहे. 5 वर्ष टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 राहणे, ऑस्ट्रेलियामध्ये 2 वेळा सीरिज जिंकणे, इंग्लंडमध्ये विजय मिळवणे हे मी साध्य केलं आहे. आम्ही लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये सर्व देशांना त्यांच्या मैदानात पराभूत केलं आहे. आता टी20 वर्ल्ड कप जिंकलो तर ते सोन्याहून पिवळं असेल. यापेक्षा जास्त काय हवं? कोणत्याही ठिकाणी आपल्या गरजेपेक्षा जास्त थांबू नये हे माझं धोरण आहे. माझ्या 4 दशकांच्या क्रिकेट करिअरमधील हा सर्वात आनंदी क्षण आहे.’ असं शास्त्री यांनी सांगितले. विराट कोहलीला BCCI देणार आणखी एक धक्का, सर्वात मोठा ‘शत्रू’ येणार परत नव्या कोचला दिला इशारा शास्त्री यांनी या मुलाखतीमध्ये मुलाखतीमध्ये भारतीयांच्या क्रिकेट वेडाबद्दल सांगितलं आहे. ‘कोव्हिड असो वा नसो त्यांना काही पर्वा नसते. त्यांची नेहमी तुम्ही जिंकावं आणि भरपूर रन करावे अशी अपेक्षा असते. भारतीय क्रिकेट टीमचा कोच होणं हे ब्राझील किंना इंग्लंडच्या फुटबॉल टीमचा कोच होण्यासारखं आहे. तुम्ही नेहमी बंदुकीच्या टोकावर असता. 6 महिने चांगलं खेळल्यानंतर 36 रनवर ऑल ऑऊट झाल्यास ते तुम्हाला गोळी मारतील. त्यानंतर तुम्हाला लगेच जिंकावं लागेल. माझ्यावर या प्रकारच्या टिकेचा काही परिणाम होत नाही,’ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. World Cup जिंकण्यासाठी घेणार राहुल द्रविडची मदत, BCCI चा निर्णय रवी शास्त्रींची 2017 साली टीम इंडियाचा हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कालावधीमध्ये भारतीय टीमला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. आगमी टी20 वर्ल्ड कप ही त्यांना आयसीसी स्पर्धा जिंकण्याची शेवटची संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.