Home /News /sport /

'मी टीम इंडियाचा कोच होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले,' रवी शास्त्रींचा मोठा गौप्यस्फोट

'मी टीम इंडियाचा कोच होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले,' रवी शास्त्रींचा मोठा गौप्यस्फोट

रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टीम इंडियाचा हेड कोच म्हणून आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

    मुंबई, 10 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीममध्ये (Indian Cricket Team) सध्या बदल सुरू आहेत. विराट कोहलीच्या जागी (Virat Kohli) रोहित शर्माची  (Rohit Sharma)  टी-20 आणि वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी टी20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) हेड कोच म्हणून पदावरून दूर झाले. त्यांच्या जागेवर राहुल द्रविडची (Rahul Dravid) नियुक्ती करण्यात आली आहे. शास्त्री आणि कोहली जोडीनं अनेक मोठे विजय मिळवले. पण, त्यांना आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले. शास्त्री यांनी टीम इंडियाचा हेड कोच म्हणून आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. रवी शास्त्री यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मी संपूर्ण सात वर्षांचा कार्यकाळ पाहतो, त्यावेळी मला जाणवते की, ही टीम 360 रनचा पाठलाग करताना 30 ते 40 रनने मागे राहत असे. आता 2021 साली 328 रनचे टार्गेट सहज पूर्ण करते. ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. अ‍ॅडलेडमध्ये 2014 साली झालेल्या टेस्टमध्ये आपल्याला याच पद्धतीने क्रिकेट खेळायचे आहे, असे मला सांगण्यात आले होते. त्याच टेस्टमध्ये धोनीच्या जागी विराट कॅप्टन झाला. तो बदल पूर्ण होण्याआधीच मला अचानक बाहेर काढण्यात आले. मी जे बी रोवले होते, त्याची फळं पिकत होती, त्याचवेळी मला बदलण्यात आले. मला कुणीही याबाबत कारण सांगितले नाही. मला योग्य पद्धतीने देखील काढता आले असते. पण, त्यांनी ज्या पद्धतीनं काढलं त्यामुळे मला वाईट वाटले. मी माझे काम (कॉमेंट्री करत होतो) त्यावेळी 9 महिन्यानंतर ती मंडळी माझ्याकडे पुन्हा आली. टीममध्ये समस्या असल्याचं मला सांगण्यात आले. मला समस्या काय आहे हे समजत नव्हतं. मी जी टीम सोडली होती, त्यामध्ये कोणतीही समस्या नव्हती.' असा दावा शास्त्री यांनी केला. शास्त्री या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाले की, माझ्या दुसऱ्या कालावधीमध्ये मी एका मोठ्या वादात अडकलो होतो. काही जणांची मला या जबाबदारीतून बाजूला करण्याची इच्छा होती. त्यांनी दुसऱ्या व्यक्तीची निवड केली आणि 9 महिन्यानंतर ज्या व्यक्तीला त्यांनी बाहेर फेकलं, त्यांच्याकडेच ते परत आले होते. 'खेळाडूंना थेट समुद्रात फेकणे योग्य नाही', विराटला हटवल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूची प्रतिक्रिया भरत अरुण यांना मी बॉलिंग कोच करू नये अशी त्यांची इच्छा होती. मी मागे वळून पाहतो तेव्हा सर्व परिस्थिती कशी बदलली हे मला जाणवते. त्यांना जी व्यक्ती बॉलिंग कोच म्हणून नको होती, त्याने दमदार कामगिरी केली. त्याच्या कामावर कुणालाही बोट दाखवता येत नाही. पण, काही खास व्यक्ती होत्या. त्यांनी मी टीम इंडियाचा हेड कोच बनू नये यासाठी जोरदार प्रयत्न केले.' असा गौप्यस्फोट शास्त्री यांनी केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket, Ravi shastri, Team india

    पुढील बातम्या