मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट कोहलीला कॅप्टनपदावरून हटवल्याचा टीम इंडियाला फायदा! रवी शास्त्रींचा मोठा दावा

विराट कोहलीला कॅप्टनपदावरून हटवल्याचा टीम इंडियाला फायदा! रवी शास्त्रींचा मोठा दावा

विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून काढल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाचे  माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या निर्णयावर मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई, 27 डिसेंबर : विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून काढल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या विषयावर क्रिकेट विश्वात एकमत नाही. त्यातच विराटसोबत भारतीय क्रिकेट टीमला विदेशात यश मिळवून देणारे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या निर्णयावर मोठं वक्तव्य केलं आहे.

विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला वन-डे आणि टी20 टीमचा कॅप्टन होण्याचा निर्णय योग्य आहे, असं वक्तव्य शास्त्री यांनी केलं आहे. 'स्टार स्पोर्ट्स' शी बोलताना शास्त्री यांनी हे वक्तव्य केले आहे. शास्त्रींनी यावेळी त्याचं कारण देखील सांगितले.

'माझ्या मते टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन वेगळा असणे योग्य निर्णय आहे. हा निर्णय विराट आणि रोहित दोघांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. कारण, कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीमध्ये एकाच व्यक्तीला तीन्ही फॉर्मेटची कॅप्टनसी सांभाळणे सोपे नाही. कारण बायो-बबलमध्ये बराच काळ राहणे अवघड आहे.'

वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरुन हटवल्यानंतर विराट टेस्ट क्रिकेटवर फोकस करू शकतो. विराटला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पूर्ण वेळ आहे. त्याच्याकडे आणखी 5-6 वर्ष क्रिकेट शिल्लक आहे, असे शास्त्रींनी यावेळी स्पष्ट केले.

IND vs SA : Golden Duck वर आऊट झालेल्या पुजाराची द्रविडने थोपटली पाठ, पाहा VIDEO

विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे अनेकदा त्याच्या कॅप्टनसीवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याचा वन-डे रेकॉर्ड दमदार आहे. विराटच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं 95 पैकी 65 वन-डे मॅच जिंकल्या आहेत. त्याच्या यशाची सरासरी 70 टक्के आहे. भारताने 19 द्विपक्षीय वन-डे  सीरिजपैकी 15 मध्ये विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज या देशातील ऐतिहासिक सीरिज विजयाचाही यामध्ये समावेश आहे.

First published:

Tags: Cricket news, Ravi shastri, Rohit sharma, Virat kohli