मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : Golden Duck वर आऊट झालेल्या पुजाराची द्रविडने थोपटली पाठ, पाहा VIDEO

IND vs SA : Golden Duck वर आऊट झालेल्या पुजाराची द्रविडने थोपटली पाठ, पाहा VIDEO

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचा बॅटर चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar Pujara) रविवारचा दिवस निराशाजनक ठरला. तो पहिल्याच बॉलवर (Golden Duck) आऊट झाला.

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचा बॅटर चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar Pujara) रविवारचा दिवस निराशाजनक ठरला. तो पहिल्याच बॉलवर (Golden Duck) आऊट झाला.

टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचा बॅटर चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar Pujara) रविवारचा दिवस निराशाजनक ठरला. तो पहिल्याच बॉलवर (Golden Duck) आऊट झाला.

  • Published by:  News18 Desk

सेंच्युरियन, 27 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियानं दमदार सुरूवात केली आहे. उपकर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) नाबाद शतकाच्या जोरावर भारतीय टीमनं पहिल्या दिवशी 3 आऊट 272 असा मजबूत स्कोअर केला आहे. टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचा बॅटर चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar Pujara) रविवारचा दिवस निराशाजनक ठरला. तो पहिल्याच बॉलवर (Golden Duck) आऊट झाला.

पुजाराने टेस्ट क्रिकेटमधील शेवटचं शतक जानेवारी 2019 मध्ये लगावले होते. त्यानंतरच्या 42 इनिंगमध्ये त्याला शतक झळकावण्यात अपयश आलं आहे. श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी हे पर्याय उलब्ध असूनही पुजाराला पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्याचा फायदा उठवण्यात तो सपशेल अपयशी ठरला. या अपयशी कामगिरीनंतरही टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडचा (Rahul Dravid) पुजारावरील विश्वास कायम आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये द्रविड पुजाराची पाठ थोपटताना दिसत आहे.

चेतेश्वर पुजारा आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रूममधील हा व्हिडीओ आहे. त्यामध्ये तो जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि प्रियांक पंचाल (Priyank Panchal) सोबत उभा आहे. त्यांच्या समोर खूर्चीवर बसलेला द्रविड उठून बाहेर जाऊ लागतो. त्यावेळी द्रविडने पुजाराला पाहताच त्याची पाठ थोपटली. द्रविडच्या या कृतीची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.

पुजाराचा रेकॉर्ड

चेतेश्वर पुजारा टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक 9 वेळा शून्यवर आऊट होणारा भारतीय बनला आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकावर 17 शतकं आणि 29 अर्धशतकं केली आहेत. मागच्या दोन वर्षांमध्ये पुजाराची टेस्ट क्रिकेटमधली कामगिरी निराशाजनक झाली आहे, त्यामुळे त्याच्यासाठी ही सीरिज महत्त्वाची आहे. योगायोग म्हणजे याआधी 2018 सालीही सेंच्युरियनच्या मैदानातच पुजारा पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता. त्यावेळी लुंगी एनगिडीने पुजाराला रन आऊट केलं होतं, तर यंदाही एनगिडीनेच पुजाराची विकेट घेतली.

Ashes Series वर कोरोनाचं संकट, इंग्लंड टीममधील 4 सदस्य पॉझिटिव्ह

First published:

Tags: Cricket news, Pujara, Rahul dravid