मुंबई, 19 फेब्रुवारी : आयपीएल मेगा ऑक्शननंतर (IPL Auction 2022) कोचनी राजीनामा दिल्यानं चर्चेत असलेल्या सनरायझर्स हैदराबादसाठी (Sunrisers Hyderabad) एक गुड न्यूज आहे. सनरायझर्सच्या अब्दुल समदनं (Abdul Samad) रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) फक्त 68 बॉलमध्ये शतक झळकावले. समदला हैदराबादने मेगा ऑक्शनपूर्वीच रिटेन केले होते. जम्मू काश्मीरकडून खेळणाऱ्या समदनं पदुच्चेरीविरूद्ध (Jammu Kashmir vs Puducherry) सुरू असलेल्या मॅचमध्ये हे शतक झळकावले. त्याने 68 बॉलमध्ये 19 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं शतक पूर्ण केले. रणजी स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासातील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक आहे.
1️⃣0️⃣0️⃣ off 6️⃣8️⃣ balls 🔥@ABDULSAMAD___1 has begun his #RanjiTrophy season with a bang 🧡#OrangeArmy #ReadyToRise #RanjiRisers #JKvCAP pic.twitter.com/r5lZ6E0c4b
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 19, 2022
रणजी स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाचा विकेट किपर बॅटप ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नावावर आहे. त्याने दिल्लीकडून खेळताना झारखंड विरूद्ध 2016 साली फक्त 48 बॉलमध्ये शतक झळकावले होते. IND vs WI : विराट कोहलीसह आणखी एका दिग्गज शेवटच्या मॅचमधून आऊट सध्या सुरू असलेल्या या रणजी मॅचमध्ये पदुच्चेरीनं पहिल्यांदा बॅटींग करत 343 रन केले होते. जम्मू काश्मीरनं तो स्कोअर ओलांडत महत्त्वाची आघाडी घेतली आहे. समदच्या 103 रनच्या खेळीमुळे त्यांना ही आघाडी मिळाली. काश्मीरचा ओपनर कमरान इक्बालनंही चांगला खेळ केला. त्याचे शतक फक्त 4 रननं हुकले. जम्मू काश्मीरच्या टीममध्ये असलेला सनरायझर्स हैदराबादचा आणखी एक खेळाडू उमरान मलिकनं (Umran Malik) पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्या.