जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs WI : विराट कोहलीसह आणखी एका दिग्गज शेवटच्या मॅचमधून आऊट

IND vs WI : विराट कोहलीसह आणखी एका दिग्गज शेवटच्या मॅचमधून आऊट

IND vs WI : विराट कोहलीसह आणखी एका दिग्गज शेवटच्या मॅचमधून आऊट

भारतीय टीमनं शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) 8 रननं पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने टी20 सीरिज जिंकली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी : भारतीय टीमनं शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) 8 रननं पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने टी20 सीरिज जिंकली आहे. आता रविवारी होणाऱ्या शेवटच्या मॅचमध्ये प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. त्यानुसार माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि विकेट किपर-बॅटर ऋषभ पंत (Rishabh Pant) रविवारच्या मॅचमध्ये खेळणार नाहीत. विराट कोहलीनं बीसीसीआयकडे 10 दिवसांची सुट्टी मागितली होती. त्याला ती सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतलाही ब्रेक देण्यात आला आहे. रविवारच्या मॅचनंतर श्रीलंका विरूद्ध होणाऱ्या टी20 सीरिजमध्येही विराट आणि पंत खेळणार नाहीत. या दोघांनीही शुक्रवारच्या मॅचमध्ये महत्त्वाचे योगदान दिले होते. विराटनं शुक्रवारच्या मॅचमध्ये 52 रनची खेळी करत आपण पुन्हा फॉर्मात येत असल्याचे संकेत दिले. विराटने त्याच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि एक सिक्स लगावला.  तर, ऋषभ पंतनं  28 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्ससह नाबाद 52 रन काढले. या खेळीबद्दल त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजचा विचार करून या दोघांनाही बायो-बबलमधून ब्रेक देत विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) टीममध्ये खेळणार हे स्पष्ट आहे. श्रेयस या टी20 सीरिजमधील एकही सामना खेळलेला नाही. त्याला वेस्ट इंडिज विरूद्धच्या वन-डे सीरिजपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यामधून बरा झाल्यावर तो शेवटची वन-डे खेळला. श्रेयसनं त्या वन-डेमध्ये 80 रनची उपयुक्त खेळी केली होती. त्यामुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. ‘बीसीसीआय’ च्या एका अधिकाऱ्यानं ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘विराट शनिवारी सकाळी घरी रवाना झाला आहे. सर्व फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना बायो-बबलमधून नियमित ब्रेक देण्याचे बीसीसीआयनं ठरवले आहे. त्यामुळे खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट आणि मानसिक आरोग्य यावर लक्ष देणे शक्य होणार आहे.’ विराट आता श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाकडून खेळेल. मोहालीमध्ये होणारी ती टेस्ट विराटच्या कारकिर्दीमधील 100 वी टेस्ट असणार आहे. U19 World Cup विजेत्या खेळाडूवर गंभीर आरोप, वाचा BCCI काय करणार कारवाई? भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक पहिली टी20- 24 फेब्रुवारी, लखनऊ दुसरी टी20- 26 फेब्रुवारी, धर्मशाला तिसरी टी20- 27 फेब्रुवारी, धर्मशाला पहिली टेस्ट- 4-8 मार्च, मोहाली दुसरी टेस्ट (डे-नाईट) - 12-16 मार्च, बँगलोर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात