जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ranji Trophy: टीम इंडियातून बाहेर असलेला खेळाडू बनला माजी विजेत्या टीमचा कॅप्टन

Ranji Trophy: टीम इंडियातून बाहेर असलेला खेळाडू बनला माजी विजेत्या टीमचा कॅप्टन

Ranji Trophy: टीम इंडियातून बाहेर असलेला खेळाडू बनला माजी विजेत्या टीमचा कॅप्टन

देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2022) स्पर्धेचा सिझन जानेवारी महिन्यात सुरू होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 डिसेंबर : देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2022) स्पर्धेचा सिझन जानेवारी महिन्यात सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या टीमची घोषणा करण्यात येत आहे. मुंबईनं पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम निवडली आहे. त्याचबरोबर माजी विजेत्या उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Cricket Team) टीमची घोषणा झाली आहे. टीम इंडियातून सध्या बाहेर असलेला स्पिनर कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) उत्तर प्रदेश रणजी टीमच्या कॅप्टनपदी निवड करण्यात आली आहे. कुलदीपनं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै महिन्यात खेळला होता. आता रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय टीममध्ये पुनरागमन करण्याची त्याला संधी आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट अससोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शर्मा यांनी 24 सदस्यांची निवड केली आहे. भुवनेश्वर कुमार आणि सौरभ कुमार यांचा ते उपलब्ध झाल्यावर टीममध्ये समावेश करण्यात येईल, असं शर्मा यांनी स्पष्ट केलं. या टीममध्ये टीम इंडियाच्या अंडर 19 टीमचा माजी कॅप्टन प्रियम गर्ग, केकेआरचा फास्ट बॉलर शिवम मावी तसेच विजय हजारे स्पर्धा गाजवलेल्या रिंकू सिंहचा देखील समावेश आहे. करण शर्मा या टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. IND vs SA : विराट कोहलीच्या चुकीवर बॅटींग कोचची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…. उत्तर प्रदेशची टीम: कुलदीप यादव (कॅप्टन), करण शर्मा (व्हाईस कॅप्टन) माधव कौशिक,अलमास शौकत, समर्थ सिंह, हरदीप सिंह, रिंकू सिंह, प्रियम गर्ग, अक्षदीप नाथ, समीर चौधरी, कृतज्ञ सिंह, अरूण जुयाल, ध्रुव सिंह जुरैल, शिवम मावी, अंकित राजपूत, यश दयाल, कृणाल यादव, प्रिंस यादव, ऋषभ बन्सल, शानू सैनी, जसमेर, जीशान अन्सारी, शिवम शर्मा आणि पार्थ मिश्रा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात