मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : विराट कोहलीच्या चुकीवर बॅटींग कोचची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

IND vs SA : विराट कोहलीच्या चुकीवर बॅटींग कोचची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) बुधवारी त्याच पद्धतीनं आऊट झाला. त्याच्याकडून सतत होणाऱ्या या चुकीवर टीम इंडियाच्या बॅटींग कोचनं प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 30 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) बुधवारी त्याच पद्धतीनं आऊट झाला. मार्को जेनसनने टाकलेला बॉल ऑफ स्टम्पच्या खूपच बाहेर होता, तरीही विराटने ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह मारण्याच्या नादात विराटच्या बॅटच्या कडेला बॉल लागला आणि दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर क्विंटन डिकॉकने त्याचा कॅच पकडला. विराट सातत्यानं या पद्धतीनं आऊट होत असल्यानं त्याच्या फॅन्सना धक्का बसला आहे.

विराटकडून होत असलेल्या या चुकीवर टीम इंडियाचे बॅटींग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राठोड यांनी या विषयावर त्यांचे मत सांगितले.  'या शॉटवर त्याने (विराट) भरपूर रन काढले आहेत. हा रन देणारा शॉट आहे. त्याने तो खेळला पाहिजे. सध्या विराटचे बलस्थानच त्याची कमकुवत  बाजू बनली आहे. त्याने शॉट मारताना चांगल्या बॉलची निवड करावी,' असा सल्ला राठोड यांनी दिला.

पुजारा-रहाणेलाही पाठिंबा

राठोड यांनी यावेळी टीम इंडियाचे सिनिअर बॅटर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahnne) यांची पाठराखण केली आहे. 'पुजारा आणि रहाणे हे त्यांचा सर्वश्रेष्ठ खेळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दोघंही आऊट होण्यापूर्वी चांगल्या पद्धतीनं खेळत होते. त्यांनी  यापूर्वी काही चांगल्या इनिंग खेळल्या आहेत. हा सर्वांसाठीच आव्हानात्मक कालखंड आहे. यामध्ये सर्वांनी संयम बाळगणे आवश्यक आहे. ते सर्वश्रेष्ठ योगदान देत आहेत तोपर्यंत कोच म्हणून आम्हाला काळजीची कोणताही गोष्ट नाही, असे राठोड यांनी स्पष्ट केले.

गावसकर नाराज

विराट गुरुवारी आऊट झाला तेव्हा सुनिल गावसकर कॉमेंट्री करत होते, यावेळी त्यांनी विराटच्या या शॉटवर प्रश्न उपस्थित केले. 'हा बॉल विराटने सोडायला पाहिजे होता. लंच ब्रेकनंतर भारतीय टीम नुकतीच बॅटिंगला आली आहे, त्यामुळे विराटने थोडा वेळ थांबायला हवं होतं. ऑफ स्टम्पच्या बाहेर बॉल होता, पहिल्या इनिंगमध्येही विराट तसाच आऊट झाला,' असं गावसकर म्हणाले.

First published:

Tags: Team india, Virat kohli