Home /News /sport /

अश्विनसोबत झालेल्या वादावर परागनं सोडलं मौन, सिनिअर खेळाडूबद्दल म्हणाला...

अश्विनसोबत झालेल्या वादावर परागनं सोडलं मौन, सिनिअर खेळाडूबद्दल म्हणाला...

आयपीएल 2022 स्पर्धेच्या दरम्यान राजस्थान रॉयल्सचा ऑल राऊंडर रियान पराग (Riyan Parag) हा खेळापेक्षा त्याच्या वागणुकीमुळे चर्चेत होता.

    मुंबई, 6 जून : आयपीएल 2022 स्पर्धेच्या दरम्यान राजस्थान रॉयल्सचा ऑल राऊंडर रियान पराग (Riyan Parag) हा खेळापेक्षा त्याच्या वागणुकीमुळे चर्चेत होता. त्याचा सुरूवातीला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेलशी (Harshal Patel) वाद झाला. त्यानंतर त्यानं त्याच्याच टीममधील सिनिअर आर. अश्विनवर (R. Ashwin) भर मैदानात नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर देवदत्त पडिक्कलवरही तो फिल्डिंग करताना संतापला होता. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर परागनं त्याच्या या वागणुकीवर स्पष्टीकरण दिलं आहे. अश्विनबाबत झालेल्या वादाबद्दल पराग म्हणाला की, 'अश्विन लोअर ऑर्डरमधील खेळाडूसोबत बॅटींग करत असता तर मी समजू शकलो असतो. मी दुसऱ्या बाजूनं बॅटींग करत असेल तर त्यानं पळायला हवं होतं. त्यामुळे मला धक्का बसला. मी त्याच्याकडं एकदा रोखून पाहिलं आणि परत गेलो. अश्विन नंतर माझ्याकडं आला आणि त्यानं मला सॉरी म्हटंल. तो त्यावेळी दुसऱ्या विचारात होता आणि त्यामुळे पळाला नाही. या प्रकरणाला सर्वांनी वेगळं वळण दिलं,' असा दावा परागनं केला आहे. परागनं यावेळी हर्षल पटेलशी झालेल्या वादावरही खुलासा केला आहे. 'मागच्या वर्षी आरसीबी विरूद्धच्या मॅचमध्ये हर्षलनं मला आऊट केलं होतं. त्यावेळी त्यानं मला हात उंचावून परत जा असा इशारा केला होता. मी ते तेव्हा पाहिलं नव्हतं. मी हॉटेलमध्ये परतल्यानंतर रिप्ले पाहिला त्यावेळी मला ते लक्षात आलं. मी यावर्षी शेवटच्या ओव्हरमध्ये रन केल्यानंतर मी त्याला उत्तर दिलं. मी कोणतीही शिवी दिली नाही.' असं परागनं सांगितलं. IPL इतिहासातील गाजलेल्या Mystery Girls, ज्यांनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ राजस्थान रॉयल्सनं रियान परागवर पुन्हा एकदा विश्वास दाखवून त्याला 3 कोटी 80 लाखांमध्ये खरेदी केलं होतं. या सिझनमध्ये एक ऑल राऊंडर म्हणून त्याच्याकडून टीमला मोठी अपेक्षा होती. एका सामन्याचा अपवाद वगळता तो ती अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. त्यानं 17 सामन्यांमध्ये अवघ्या 16.63 च्या सरासरीनं 183 रन केले. संपूर्ण सिझनमध्ये परागनं फक्त 1 अर्धशतक झळकावलं.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Ipl 2022, R ashwin, Rajasthan Royals

    पुढील बातम्या