मुंबई, 6 जून : आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची टी20 लीग आहे. आयपीएलमधून दरवर्षी नव्या क्रिकेट स्टार्सचा उदय होतो. त्याचबरोबर मिस्ट्री गर्ल्स (Mystery Girls) देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतात. आयपीएल स्पर्धेतील एका मॅचमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या तसंच संपूर्ण देशाला माहिती झालेल्या या मिस्ट्री गर्ल्स कोण आहेत ते पाहूया
आयपीएल 2022 मधील चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) मॅचच्या दरम्यान एका मिस्ट्री गर्ल्सनं देशाचं लक्ष वेधून घेतलं. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसोबत ती उपस्थित होती. त्या मिस्ट्री गर्लचं नाव आरती बेदी आहे. आरती डॉक्टर असून जुही जावलाची मुलगी जानव्ही मेहताची मैत्रिण आहे.
2019 आयपीएल फायनलदरम्यान निळ्या रंगाचा टीशर्ट घालून एक मुलगी स्टेडियममध्ये आली होती. आदिती हुंडिया असं या मुलीचं नावं असून ती अनेकदा मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये उपस्थित असते.
आदिती हुंडिया फॅशन आणि ग्लॅमरच्या दुनियेतील लोकप्रिय चेहरा आहे. 2018 साली ती मिस दिवा सुपरनॅशनल इंडिया पुरस्कारही जिंकली होती. आदिती मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू इशान किशनची गर्लफ्रेंड असल्याचंही बोललं जातं. (Aditi Hundia/Instagram)
आयपीएल IPL 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला चिअर करण्यासाठी आलेली एक मुलगी चाहत्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला गेला. ही मुलगी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. लाल रंगाच्या टॉपमध्ये हॉट दिसणाऱ्या या मिस्ट्री गर्लचे नाव दीपिका घोष (Deepika Ghose) आहे. दीपिका कोरिओग्राफर आणि कंटेंट क्रिएटर आहे.
मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल 2020 मध्ये झालेल्या मॅचमधील सुपर ओव्हरमध्ये नखं खाताना एक मुलगी व्हायरल झाली होती. रियाना लालवानी असं तिचं नाव आहे.
आयपीएल 2018 मध्ये मालती चहर रातोरात स्टार बनली. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचमध्ये ती पहिल्यांदा कॅमेऱ्यात कैद झाली होती. मालती ही टीम इंडियाचा क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण असून महेंद्रसिंह धोनीची कट्टर फॅन आहे. मालती मॉडेलिंग आणि अभिनयही करते. (Malti Chahar/Instagram)
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला सपोर्ट करण्यासाठी एक मिस्ट्री गर्ल नेहमीच येते. काव्या मारन(Kaviya Maran )असे या मुलीचे नाव आहे. काव्या मारन ही सन ग्रुपच्या मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) हा त्याचा संघ आहे. काव्या मारन ही कलानिधी मारन यांची मुलगी आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात अश्रिता शेट्टी या मिस्ट्री गर्लनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्रिता ही तामिळ अभिनेती असून भारतीय क्रिकेटपटू मनिष पांडेची पत्नी आहे.
राखी कपूर टंडन 2015 आयपीएल फायनलदमर्यान चर्चेत आली. या मॅचमध्ये राखीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.तिला लग्नाचे अनेक प्रस्ताव आले. त्यानंतर आपलं यापूर्वीच लग्न झाल्याचं राखीनं जाहीर करत नवऱ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.