मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धक्कादायक! भारतीय क्रिकेटपटूचे 36 व्या वर्षीच कोरोनामुळे निधन

धक्कादायक! भारतीय क्रिकेटपटूचे 36 व्या वर्षीच कोरोनामुळे निधन

आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या (IPL 2021) चार क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्यानं ही स्पर्धा स्थगित (IPL 2021) करावी लागली. त्यातच भारतीय क्रिकेटला कोरोनामुळे आणखी एक धक्का बसला आहे.

    जयपूर, 6 मे : देशात कोरना व्हायरसच्या (coronavirus) रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या (IPL 2021) चार क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्यानं ही स्पर्धा स्थगित (IPL 2021) करावी लागली. त्यातच भारतीय क्रिकेटला कोरोनामुळे आणखी एक धक्का बसला आहे. राजस्थानचा (Rajasthan) क्रिकेटपटू विवेक यादव (Vivek Yadav) याचं वयाच्या 36 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालं आहे. विवेक गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होता. त्यातच त्याला गेल्या आठवड्यात कोरोना झाला होता. विवेकनं 2008 साली राजस्थानकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. राजस्थाननं 2010-11 साली रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. त्या टीमचाही तो सदस्य होता. विवेकनं फायनल मॅचमध्ये बडोद्याविरुद्ध चार विकेट्स घेतल्या होत्या. रेल्वे विरुद्ध दिल्लीत झालेल्या रणजी मॅचमध्ये त्यानं 134 रन देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती. विवेक 2012 साली दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD) या आयपीएल टीमचा सदस्य होता. त्याचबरोबर भारत अंडर-19 आणि राजस्थान रॉयल्सकडूनही तो क्रिकेट खेळला आहे. ऋषिकेश कानिटकरच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान टीमचा तो नियमित सदस्य होता. असा हवा कॅप्टन! कोरोना संकटात महेंद्रसिंह धोनीचा निर्णय वाचून वाटेल अभिमान विवेकच्या मित्रांनी आणि सहकारी क्रिकेटपटूंनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "आव्हानांचा सामना करण्यास सदैव सज्ज असलेला क्रिकेटपटू असं त्यांनी विवेकचं वर्णन केलं आहे." राजस्थान क्रिकेट असोसिएशननं देखील याबाबत शोक व्यक्त केलाय. कोरोनामुळे राजस्थान क्रिकेटचं या आठवड्यात झालेलं हे दुसरं नुकसान आहे. यापूर्वी राजस्थान क्रिकेटमध्ये टायगर या नावावे प्रसिद्ध असलेले किशन रुंगठा यांचं वयाच्या 89 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालं. ते राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य होते. त्याचबरोबर राजस्थान रणजी टीमचे माजी कॅप्टन देखील होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket, Rajasthan

    पुढील बातम्या