मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

असा हवा कॅप्टन! कोरोना संकटात महेंद्रसिंह धोनीचा निर्णय वाचून वाटेल अभिमान

असा हवा कॅप्टन! कोरोना संकटात महेंद्रसिंह धोनीचा निर्णय वाचून वाटेल अभिमान

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं  घेतलेल्या एका निर्णयामुळे क्रिकेट फॅन्सचं मन जिंकलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं घेतलेल्या एका निर्णयामुळे क्रिकेट फॅन्सचं मन जिंकलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं घेतलेल्या एका निर्णयामुळे क्रिकेट फॅन्सचं मन जिंकलं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 6 मे: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यानं  घेतलेल्या एका निर्णयामुळे क्रिकेट फॅन्सचं मन जिंकलं आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा (IPL 2021 Suspended) निर्णय बीसीसीआयनं मंगळवारी (4 मे) घेतला. या निर्णयानंतर सर्व खेळाडू हळूहळू घरी परतत आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली देखील पत्नी अनुष्का शर्मासह मुंबईला परतला आहे. त्याचवेळी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या टीममधील सर्व खेळाडू परतल्यानंतरच रांचीला घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई टीमच्या एका सदस्यानं दिलेल्या माहितीनुसार 'विदेशी खेळाडू घरी परतल्यानंतरच घरी जाण्याचा निर्णय धोनीनं घेतला आहे. चेन्नईचे सर्व खेळाडू सध्या दिल्लीमध्ये आहेत. मोईन अली (Moeen Ali) आणि सॅम करन (Sam Curran) हे दोन इंग्लिंश खेळाडू बुधवारी मायदेशी परतले आहेत. सर्व विदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानानं मायदेशी पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.

चेन्नई टीमच्या व्हर्च्युअल बैठकीत धोनीनं सांगितलं की, "आयपीएल भारतामध्ये होत आहे. विदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला घरी जाण्याची प्राथमिकता मिळाली पाहिजे. भारतीय खेळाडू नंतर घरी जाऊ शकतात." सीएसकेच्या एका सदस्यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, "हॉटेलमधून बाहेर जाणारा माही हा टीमचा शेवटचा व्यक्ती असेल. तो पहिल्यांदा विदेशी खेळाडूंना आणि नंतर भारतीय खेळाडूंना घरी पाठवणार आहे. सर्वजण सुरक्षित घरी परतल्यानंतर तो घरी जाण्यासाठी विमान पकडेल."

IPL 2021: विदेशी खेळाडूंच्या मदतीसाठी धावली Mumbai Indians! मायदेशी पाठवण्यासाठी करणार खास उपाय

चेन्नईनं दिल्लीहून खेळाडूंना घरी जाण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे.  एक दहा सीटर विमानानं त्यांना राजकोट आणि मुंबईत सोडलं जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी बंगळुरु आणि चेन्नईमध्ये अन्य खेळाडूंना नेण्यात येईल. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज टीमनंही भारतीय खेळाडूंसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. तर कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थान टीमचे खेळाडू घरी रवाना झाले आहेत.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni