मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /IND vs SA: राहुल द्रविडच्या प्लॅनिंगचा टीम इंडियाला फायदा, पहिल्या दिवसानंतर झाला खुलासा

IND vs SA: राहुल द्रविडच्या प्लॅनिंगचा टीम इंडियाला फायदा, पहिल्या दिवसानंतर झाला खुलासा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सेंच्युरियन टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियानं दमदार सुरूवात केली आहे. या खेळाचे प्लॅनिंग टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) केले होते.

सेंच्युरियन, 27 डिसेंबर:  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सेंच्युरियन टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियानं दमदार सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी केएल राहुलचं (KL Rahul) शतक आणि मयंक अग्रवालचे (Mayank Agarwal) 60 रन यामुळे टीम इंडियानं 3 आऊट 272 रन काढले आहेत. भारतीय टीमच्या या चांगल्या कामगिरीसाठी हेड कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) केलेले प्लॅनिंग उपयोगी ठरले, असा खुलासा मयंकनं केला आहे.

मयंकनं पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना याबाबत खुलासा केला. 'शिस्तबद्ध खेळ करण्याची आमची योजना होती. स्टंपवर येणारे बॉल खेळायचे आणि बाहेर जाणारे जास्तीत जास्त बॉल सोडून देण्याचे आमचे नियोजन होते. तसा खेळ आम्ही केला. 3 आऊट 272 हा स्कोअर होण्याचं श्रेय बॅटींग युनिटला जातं. आम्ही जास्तीत जास्त क्रिजवर थांबावं अशी राहुल द्रविडची योजना होती.' असे मयंकने सांगितले.

मयंकनं यावेळी पहिल्या दिवसाचा शतकवीर राहुलच्या खेळाची प्रशंसा केली. 'राहुलचं शतक महत्त्वाचं आहे. आम्ही पार्टनरशीप केल्या त्या निर्णयाक ठरल्या. राहुलने माझ्यासोबत तसंच विराट भाई आणि रहाणे बरोबर पार्टनरशीप केली. तो पुढेही तसाच खेळेल. आम्ही मॅचपूर्वी परिस्थितीचा अंदाज येण्यासाठी बराच सराव केला होता.आता दुसऱ्या दिवशी आम्हाला जास्तीत जास्त रन करायचे आहेत. पहिल्या तासाचा खेळ महत्त्वाचा आहे. आम्ही तासभर चांगला खेळ केला तर दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढेल,' असे मयंकने स्पष्ट केले.

IPL चॅम्पियन क्रिकेटपटूचा भारतीय क्रिकेटला अलविदा, आता अमेरिकेत खेळणार

पहिल्या दिवसाच्या अखेर  केएल राहुल (KL Rahul) 122 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 40 रनवर खेळत आहे. केएल राहुलच्या 248 बॉलच्या खेळीमध्ये 16 फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी 117 रनची पार्टनरशीप केली

First published:

Tags: Cricket news, Rahul dravid, South africa, Team india