• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : क्वारंटाईनला कंटाळलेल्या डेव्हिड वॉर्नरला रोहित शर्मानं केलं ट्रोल!

IPL 2021 : क्वारंटाईनला कंटाळलेल्या डेव्हिड वॉर्नरला रोहित शर्मानं केलं ट्रोल!

सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला क्वारंटाईनचा कालावधी कसा घालवायचा हा प्रश्न पडला आहे. या विषयावर वॉर्नरनं सल्ला विचारताच रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्याला ट्रोल केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 3 एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) हा आयपीएल स्पर्धेसाठी भारतामध्ये दाखल झाला आहे. आयपीएलच्या नियमानुसार वॉर्नरला सात दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. क्वारंटाईन कालावधीमधील सात दिवसांचा कालावधी कसा घालवायचा असा प्रश्न वॉर्नरला पडला आहे. त्यानं याबाबत इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ पोस्ट करुन फॅन्सला त्यांचा सल्ला विचारला आहे. वॉर्नरच्या या व्हिडीओवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने भन्नाट उत्तर दिलं आहे. 'मी भारतामध्ये आलो आहे, तसंच आयपीएल खेळण्यासाठी सज्ज आहे. पण या क्वारांटाईन कालावधीमध्ये काय करु याबाबत सल्ला द्या. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा असा प्रश्न विचारणारा एक व्हिडीओ वॉर्नरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
  वॉर्नरच्या या व्हिडीओवर रोहित शर्मानं भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. 'तू कदाचित टीकटॉकला (TikTok) मिस करत असशील' असं मजेदार उत्तर रोहितनं वॉर्नरला दिलं आहे. भारतामध्ये टीकटॉकला बंदी आहे. तर डेव्हिड वॉर्नर हा मोठा टिकटॉक स्टार आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या दरम्यान वॉर्नरनं अनेक टिकटॉक व्हिडीओ शेअर केले होते. त्याला क्रिकेट फॅन्सचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयपीएलच्या नियमानुसार भारत-इंग्लंड मालिकेत सहभागी झालेले खेळाडूच त्यांच्या आयपीएल टीममध्ये थेट जाऊ शकतात. अन्य सर्व खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफला सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे. डेव्हि़ वॉर्नरसह सनरायझर्स हैदराबादचे अन्य खेळाडूही सध्या त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. यामध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन आणि साहय्यक कोच ब्रॅड हॅडीन यांचाही समावेश आहे. ( वाचा : 'IPL दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट नको', इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा सल्ला ) सनरायझर्स हैदराबादानं मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) तिसरा क्रमांक पटकावला होता. यंदा त्यांची पहिली मॅच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध चेन्नईमध्ये होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: