• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'IPL दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट नको', इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा सल्ला

'IPL दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट नको', इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा सल्ला

इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen ) याने मोठं वक्तव्य केलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करु नये असा सल्ला पीटरसननं दिला आहे.

 • Share this:
  लंडन, 3 एप्रिल : आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान (IPL 2021) आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने असावे का? यावर क्रिकेट विश्वात सध्या चर्चा सुरु आहे. अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ऐवजी आयपीएलला प्राधान्य दिलं आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) यानं मोठं वक्तव्य केलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करु नये असा सल्ला पीटरसननं दिला आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान होणार आहे. इंग्लंडची न्यूझीलंड विरुद्धची टेस्ट सीरिज 2 जूनपासून सुरु होणार आहे. त्यामुळे अनेक इंग्लंडचे खेळाडू या सीरिजमध्ये खेळावं की नाही? या संभ्रमात आहेत. त्यांची टीम आयपीएलच्या फायनलमध्ये गेली तर त्यांना टेस्ट सीरिज किंवा आयपीएल यापैकी एकाची निवड करावी लागेल. अर्थात खेळाडूंना ही निवड करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल, असं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केले आहे. केव्हिन पीटरसननं याबाबत एक ट्विट केलं आहे. 'आयपीएल ही सर्वात मोठी स्पर्धा आहे, हे सर्व क्रिकेट बोर्डांना समजलं पाहिजे. या काळात कोणतीही आंतरराष्ट्रीय मॅच खेळली जाऊ नये. हे इतकं सोपं आहे.' Cricket boards need to realise that the @IPL is the biggest show in town. DO NOT schedule ANY international games whilst it’s on. V v v simple! — Kevin Pietersen (@KP24) April 2, 2021 इंग्लंडचे 14 खेळाडू या आयपीएलमध्ये खेळणार आहेत. यामध्ये इयन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, जेसन रॉय, डेव्हिड मलान, जॉनी बेयरस्टो, लियम लिविंग्स्टोन यांचा समावेश आहे. (वाचा : The Hundred आणि अन्य लीगमध्ये खेळण्याची भारतीय खेळाडूंची इच्छा, इंग्लंडच्या कॅप्टनचा दावा ) 5 आंतरराष्ट्रीय टीम खेळणार क्रिकेट आयपीएल स्पर्धेच्या काळात 5 आंतरराष्ट्रीय टीम क्रिकेट खेळणार आहेत. यामध्ये सर्वात जास्त मॅच पाकिस्तानची टीम खेळणार आहे. याचं कारण म्हणजे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही. पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या टीमही या कालावधीमध्ये क्रिकेट खेळणार आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: