कराची, 29 जानेवारी : कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) यांच्यात पहिली टेस्ट सुरु आहे. या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या इनिंगमध्ये 220 रन्स केले होते. त्याला उत्तर देताना पाकिस्ताननं 378 रन्स करत मोठी आघाडी घेतली. पाकिस्तानच्या बॅट्समन्सनं चांगलं प्रदर्शन करत टीमला मजबूत स्थितीमध्ये नेलं. या मॅचच्या दरम्यान ICC नं केलेल्या एका ट्विटनंतर पाकिस्तानचे फॅन्स चांगलेच संतापले आहेत. काय आहे प्रकरण? ICC नं गुरुवारी पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन अलीचे ((Hasan Ali) दोन फोटो ट्विट केले. या फोटोत त्यांनी दोन बाजू दाखवल्या आहेत. पहिल्या फोटोत हसन अली जबरदस्त शॉट खेळताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तो बोल्ड झाला आहे. ICC नं यावर ‘तुमचा प्रोफाईल फोटो आणि पूर्ण फोटो’ असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. हसन अलीच्या फोटोवर तयार करण्यात आलेलं हे मीम पाकिस्तानच्या फॅन्सना आवडलेलं नाही.
(वाचा - सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अॅन्जिओप्लास्टी, वाचा तब्येतीचे अपडेट्स )
भारतीय फॅन्सनी केलं ट्रोल पाकिस्तानच्या फॅन्सच्या कमेंट पाहिल्यानंतर भारतीय फॅन्सनं देखील या वादामध्ये उडी घेतली. भारतीय फॅन्सनी हे ट्विट खेळकर पद्धतीनं घ्या असा सल्ला दिला. हसन अलीनं या मॅचमध्ये 9 व्या नंबरवर येत चांगली बॅटिंग केली. त्यानं 33 बॉलमध्ये 21 रन केले. यावेळी हसन अली रबाडाच्या बॉलवर बोल्ड झाला. त्याचा फोटो ICC नं ट्विट केला. यापूर्वी बॅटिंग करताना हसन अलीचा दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन क्विंटन डी कॉक सोबत वाद झाला होता.
(वाचा - टीम इंडियाच्या ऑलराऊंडरची नवी इनिंग, पाहा लग्नातले PHOTO )
रबाडाचा विक्रम क्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याने टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा ओलांडला आहे. रबाडाने हा विक्रम 44व्या टेस्टमध्येच केला आहे. पाकिस्तानचा बॅट्समन हसन अली रबाडाचा 200वा शिकार ठरला. 25 वर्षांचा रबाडा टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी वयात 200 विकेट घेणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

)







