टीम इंडियाच्या ऑलराऊंडरची नवी इनिंग, पाहा लग्नातले PHOTO

टीम इंडियाच्या ऑलराऊंडरची नवी इनिंग, पाहा लग्नातले PHOTO

टीम इंडिया (Team India) चा आणखी एक खेळाडू विवाहबंधनात अडकला आहे. ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकर (Vijay Shankar) याचं बुधवारी वैशाली विश्वेश्वरन(Vaishali Visweswaran) बरोबर कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने लग्न झालं.

  • Share this:

चेन्नई, 28 जानेवारी : टीम इंडिया (Team India) चा आणखी एक खेळाडू विवाहबंधनात अडकला आहे. ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकर (Vijay Shankar) याचं बुधवारी वैशाली विश्वेश्वरन(Vaishali Visweswaran) बरोबर कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने लग्न झालं. विजयने मागच्यावर्षी ऑगस्टमध्ये वैशालीबरोबर साखरपुडा केला होता. त्याच्या या नवीन इनिंगला आयपीएलमधील त्याच्या टीमने म्हणजेच सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) ने शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयला आयपीएलमधील (IPL) सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याच्या लग्नातील फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 'आम्ही विजय शंकरला त्याच्या आयुष्यातील खास दिवसाबद्दल शुभेच्छा देतो. तुझे वैवाहिक आयुष्य सुखी रहावे', अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या लग्नाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत.

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा केल्यानंतर त्याला केएल राहुल, युजवेंद्र चहल, करुण नायर, अभिनव मुकुंद यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला टीम इंडियात स्थान देण्यात आलं नव्हतं. विजय शंकर हा 2019 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. पण वर्ल्ड कप सुरू असतानाच दुखापत झाल्यामुळे त्याला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती.

विजय शंकर (Vijay Shankar) याने जानेवारी 2018 ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मॅचमधून पदार्पण केले होते. त्याने 2018 सालीच मे महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर नुकतेच आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) विजय शंकरला (Vijay Shankar) या मोसमासाठी रिटेन केलं आहे. टीममध्ये खूप बदल करण्यात आले नसून केवळ पाच खेळाडूंना सोडण्यात आलं आहे. हैदराबादकडे जवळपास 11 कोटी रुपये शिल्लक आहेत, त्यामुळे या लिलावात ते आणखी काही खेळाडू खरेदी करू शकतात.

टीममध्ये ठेवलेले खेळाडू : केन विलियमसन, डेविड वॉर्नर, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, समद, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शहबाज नदीम, मिचेल मार्श, विजय शंकर, मोहम्‍मद नबी, राशिद खान, ऋद्धिमान साहा, श्रीवत्‍स गोस्‍वामी, बसील थम्‍पी आणि जेसन होल्‍डर.

सोडलेले खेळाडू : बिली स्‍टानलेक , फॅबियन एलन, बवांका संदीप, संजय यादव, पृथ्‍वी राज

First published: January 28, 2021, 6:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या