मुंबई, 17 मार्च : रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) झारखंड विरूद्ध नागालँड (Jharkhand vs Nagaland) मॅच ड्रॉ झाली आहे. या मॅचमध्ये पहिल्या इनिंगच्या आघाडीच्या जोरावर झारखंडनं स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण, झारखंडच्या मॅचमधील डावपेचावर टीका होत आहे. झारखंडनं एकूण 1008 रनची आघाडी घेत मॅच ड्रॉ केली. त्यामुळे या टीमनं क्रिकेटची थट्टा केल्याचा आरोप क्रिकेट फॅन्सनी केला आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) टीमनं क्रिकेटचा कोणताही नियम तोडला नाही. पण, 5 दिवसाच्या मॅचमध्ये या टीमनं प्रतिस्पर्धी टीमला नक्कीच अपमानित केले आहे. ही टीम जिंकण्यासाठी खेळत होती की बॅटींग प्रॅक्टीस करत होती? असा प्रश्न फॅन्स विचारत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आरएम लोढा यांनी दिलेल्या शिफारशींवरही या मॅचनंतर फॅन्स प्रश्न विचारत आहेत. एक पूर्णवेळ फर्स्ट क्लास क्रिकेट टीम आणि खेळाचा विकास न झालेल्या भागातील टीम याचा फरक लोढा समिती तसंच बीसीसीआयचे माजी नियंत्रक विनोद राय यांच्या प्रशासनाला समजला नाही, असे मत फॅन्सनी व्यक्त केले आहे.
मॅचमध्ये किती रन झाले? सौरभ तिवारीच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या झारखंडनं या मॅचमध्ये एकूण 1297 रन काढले. झारखंडनं पहिल्यांदा बॅटींग करत 880 रन काढले. त्याला उत्तर देताना नागालँडची पहिली इनिंग 289 रनवर संपुष्टात आली. पहिल्या इनिंगमध्ये 591 रनची आघाडी घेतल्यानंतर झारखंडनं क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरही त्यांनी नागालँडला फॉलोऑन दिला नाही.
Women’s World Cup : फॉर्मात नसलेल्या मितालीच्या मदतीला धावली झुलन, टीकाकारांना म्हणाली…
पाचव्या दिवशी झारखंडनं 2 आऊट 132 रनपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. अखेर दुसऱ्या सेशनमध्ये झारखंडचा स्कोअर 6 आऊट 417 झाल्यावर दोन्ही टीमनं मॅच ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला. झारखंडनं या मॅचमध्ये एकूण 1008 रनची आघाडी घेतली. हा फर्स्ट क्लास क्रिकेटमधील रेकॉर्ड आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.