मुंबई, 13 नोव्हेंबर: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) सध्या चर्चेत आहे. टी20 वर्ल्ड कपच्या वेळी (T20 World Cup 2021) सानिया क्रिकेट स्टेडियममध्ये उपस्थित होती. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील सेमी फायनलच्या दरम्यान सानिया पाकिस्तान टीमला पाठिंबा देताना दिसली होती. त्याचबरोबर सानिया आता आणखी एका कारणांमुळे चर्चेत आली आहे. सानियानं नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती एका फिल्मी डायलॉगवर अभिनय करत तिचा नवरा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकला (Shoaib Malik) टोला लगावत आहे.‘बेटा, ज्या लोकांना तुमझी पर्वा नसेल त्यांच्यापासून दूर राहा’ या फिल्मी डायलॉगनं या व्हिडीओची सुरूवात होते. त्यानंतर सानिया म्हणते की. ‘मी त्याच्याच घरी राहते.’ त्यानंतर बेडवर झोपलेला शोएब मलिक या व्हिडीओमध्ये दिसतो. ‘घर की मुर्गी दाल बराबर’ असं कॅप्शन सानियानं या व्हिडीओला दिलं आहे.
सानियाच्या या व्हिडीओवर क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाची पत्नी शीथला आणि चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘उत्तम अभिनेत्री’ अशी प्रतिक्रिया फराह खाननं दिली आहे. सानियाचा नवरा शोएब मलिक टी20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या टीममध्ये होता. त्यानं स्कॉटलंड विरुद्ध 18 बॉलमध्ये नाबाद 54 रनची खेळी केली होती. तसंच न्यूझीलंड विरूद्धही 20 बॉलमध्ये नाबाद 26 रन काढले होते. T20 World Cup: ‘त्यानं डोकं वापरायला हवं होतं,’ पाकिस्तानच्या पराभवानंतर आफ्रिदी जावयावर नाराज सानिया आणि शोएबनं 2012 साली लग्न केलं असून त्यांना एक मुलगा देखील आहे.