जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : SRH ची नव्या मोसमातही जुनीच कामगिरी, राजस्थानचा दणदणीत विजय

IPL 2022 : SRH ची नव्या मोसमातही जुनीच कामगिरी, राजस्थानचा दणदणीत विजय

Photo-IPL/Twitter

Photo-IPL/Twitter

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमातही सनरायजर्स हैदराबादची (SRH vs RR) सुरूवात निराशाजनक झाली आहे. मागच्या मोसमात शेवटच्या क्रमांकावर राहिलेल्या हैदराबादचा यंदाच्या पहिल्याच सामन्यात दारूण पराभव झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 29 मार्च : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमातही सनरायजर्स हैदराबादची (SRH vs RR) सुरूवात निराशाजनक झाली आहे. मागच्या मोसमात शेवटच्या क्रमांकावर राहिलेल्या हैदराबादचा यंदाच्या पहिल्याच सामन्यात दारूण पराभव झाला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात हैदराबादचा तब्बल 61 रनने पराभव झाला. राजस्थानने दिलेलं 211 रनचं आव्हान पार करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून फक्त 149 रनपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून एडन मार्करमने (Aiden Markram) 41 बॉलमध्ये नाबाद 57 रन केले, तर आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 14 बॉलमध्ये 40 रनची तडाखेबाज खेळी केली. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. ट्रेन्ट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. हैदराबादच्या नावावर या सामन्यात लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली. आयपीएल इतिहासात पॉवर प्लेमध्ये हैदराबादने सगळ्यात कमी रन केल्या. या सामन्यात पहिल्या 6 ओव्हरमध्ये हैदराबादला 3 विकेट गमावून फक्त 14 रन करता आल्या. हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 210 रनपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) 27 बॉलमध्ये 55 रन केले, तर पडिक्कलने 41, जॉस बटलरने 35 आणि हेटमायरने 32 रनची खेळी केली. हैदराबादकडून उमरान मलिक आणि टी नटराजन यांना प्रत्येकी 2-2 विकेट आणि भुवनेश्वर तसंच रोमारियो शेफर्डला 1-1 विकेट घेण्यात यश आलं. हैदराबादच्या बॉलरनी या सामन्यात निराशाजनक बॉलिंग केली. भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर पहिल्याच ओव्हरला जॉस बटलर शून्य रनवर आऊट झाला होता, पण तो नो बॉल होता. यानंतर उमरान मलिकच्या बॉलिंगवर पुन्हा एकदा बटलरचा स्लिपमध्ये कॅच सोडण्यात आला, पण हादेखील नो बॉल होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात