मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : रोहित इतिहास घडवण्यापासून 3 पावलं दूर, धोनी-कोहली जवळपासही नाहीत!

IPL 2021 : रोहित इतिहास घडवण्यापासून 3 पावलं दूर, धोनी-कोहली जवळपासही नाहीत!

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात असेल. या सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma) इतिहास घडवण्याची संधी आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 18 सप्टेंबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात असेल. या सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma) इतिहास घडवण्याची संधी आहे.

रोहित शर्माने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 397 सिक्स मारल्या आहेत. 400 सिक्सचा टप्पा गाठण्यापासून रोहित शर्मा फक्त 3 पावलं दूर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 400 सिक्स मारणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय खेळाडू ठरेल. टी-20 मध्ये 300 पेक्षा जास्त सिक्स ठोकणारे फक्त 3 भारतीय आहेत. सुरेश रैनाने (Suresh Raina) 324, विराट कोहलीने (Virat Kohli) 315 आणि एमएस धोनीने (MS Dhoni) 303 सिक्स मारल्या.

टी-20 इतिहासात सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. तर या यादीत कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल, ब्रेण्डन मॅकल्लम, शेन वॉटसन, एबी डिव्हिलियर्स आणि एरॉन फिंच रोहित शर्माच्या पुढे आहेत.

आयपीएलमध्ये रोहित शर्मा हा सगळ्यात यशस्वी कॅप्टन आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने तब्बल 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या, तर एमएस धोनीने चेन्नईला तीन वेळा चॅम्पियन बनवलं. रोहित कर्णधार असताना मुंबईने 2013, 2015, 2017, 2019, 2020 साली विजय मिळवला. तर धोनीने 2010, 2011 आणि 2018 साली चेन्नईला चॅम्पियन बनवलं.

मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 31 मॅच झाल्या, यातल्या 19 मॅचमध्ये मुंबईचा तर 12 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला. मागच्या मोसमात दोन्ही टीमनी एक-एक मॅच जिंकली. तर 2019 साली चारही सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला होता.

याआधी याच मोसमात चेन्नईविरुद्ध (Chennai Super Kings) झालेल्या सामन्यात मुंबईचा शेवटच्या बॉलवर रोमांचक विजय झाला होता. चेन्नईने पहिले बॅटिंग करत 218/4 एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अखेरच्या बॉलवर 6 विकेट गमावून केला. पोलार्डने (Kieron Pollard) 34 बॉलमध्ये नाबाद 84 रन केले. दुबईमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या सामन्यात पुन्हा मोठा स्कोअर बघायला मिळू शकतो.

आयपीएल 2021 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चौथ्या क्रमांकावर आहे. टीमने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या, त्यामुळे त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. तर दिल्लीची टीम 8 पैकी 6 मॅच जिंकत 12 पॉईंट्ससह टॉपवर आहे. चेन्नई 10 पॉईंट्ससह दुसऱ्या आणि बँगलोरही 10 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rohit sharma, T20 cricket