मुंबई, 18 सप्टेंबर : यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपचं (T20 Worl काऊंट डाऊन सुरू झालं आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा समावेश ग्रुप 2 मध्ये करण्यात आला आहे. ग्रुप 2 मध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पात्रता फेरीत विजयी झालेल्या दोन टीमचा समावेश असेल. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली टीम इंडियाची ही शेवटची टी20 स्पर्धा आहे. त्यामुळे विराटच्या कॅप्टनसीचा शेवट गोड करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टीम इंडियाची पहिली लढत ही 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आजवर भारतीय टीमनं पाकिस्तानवर नेहमीच वर्चस्व गाजवलं आहे. पण, पाकिस्तानपूर्वी आणखी दोन तगड्या टीमचा विराट कोलीच्या टीमला सामना करावा लागणार आहे. आयसीसीनं टी20 वर्ल्ड कपच्या वॉर्मअप सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये टीम इंडिया दोन सामने खेळणार आहे. पहिला सामना इंग्लंड विरुद्ध 18 ऑक्टोबरला होणार असून दुसरा सामना 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. दोन तगड्या टीमविरुद्धच्या सराव सामन्यानंतर भारतीय टीमला वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम रणनीती तयार करण्यात मदत होणार आहे.
विराटच्या निर्णयावर टीम इंडियातून प्रतिक्रिया, कॅप्टनपदी कायम राहण्याची सहकाऱ्याची मागणी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर टीम इंडियाचं वेळापत्रक 24 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान 31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड 3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान 5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-बी क्वालिफायर टॉप टीम 8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-ए क्वालिफायर दुसरी टीम 10 नोव्हेंबर- पहिली सेमी फायनल 11 नोव्हेंबर- दुसरी सेमी फायनल 14 नोव्हेंबर- फायनल