मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

भारतीय टेस्ट क्रिकेटचा सर्वात अविस्मरणीय दिवस, द्रविड-लक्ष्मणपुढे कांगारूंनी टेकले होते गुडघे!

भारतीय टेस्ट क्रिकेटचा सर्वात अविस्मरणीय दिवस, द्रविड-लक्ष्मणपुढे कांगारूंनी टेकले होते गुडघे!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कोलकाता टेस्टमध्ये आजच्या दिवशी 21 वर्षांपूर्वी (14 मार्च 2001) इतिहास घडला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कोलकाता टेस्टमध्ये आजच्या दिवशी 21 वर्षांपूर्वी (14 मार्च 2001) इतिहास घडला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कोलकाता टेस्टमध्ये आजच्या दिवशी 21 वर्षांपूर्वी (14 मार्च 2001) इतिहास घडला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 मार्च : टेस्ट क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात फक्त 3 वेळा फॉलोऑन मिळालेल्या टीमनं विजय मिळवला आहे. यापैकी एक विजय टीम इंडियाच्या नावावर आहे. 2001 साली कोलकातामध्ये झालेल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं ही कामगिरी केली. व्हीव्हीएस लक्ष्मणचे (VVS Laxman) 281 रन, राहुल द्रविडचे (Rahul Dravid) 180 रन आणि हरभजन सिंगची (Harbhajan Singh) हॅट्ट्रिक यामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. कोलकातामध्ये 21 वर्षांपूर्वी झालेल्या त्या टेस्टच्या अनेक आठवणी आहेत. पण त्यामधील सर्वात अविस्मरणीय आठवण आजच्या दिवसाची (On This Day) आहे. आजच्याच दिवशी (14 मार्च 2001)  द्रविड-लक्ष्मण जोडी दिवसभर आऊट झाली नव्हती.

अविस्मरणीय दिवस का?

स्टीव्ह वॉ (Steve Waugh) याच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये सर्वच्या सर्व 11 खेळाडू हे दिग्गज होते. सर्व जग जिंकून ऑस्ट्रेलियाची टीम भारतामध्ये दाखल झाली होती. त्या दौऱ्यातील मुंबई टेस्ट ऑस्ट्रेलियाने सहज जिंकली. त्यानंतर कोलकातामध्ये भारताची पहिली इनिंग ही फक्त 171 रनवर आटोपली. भारतावर 'फॉलो ऑन' ची नामुष्की ओढावली होती. कोलकाता टेस्टसह मालिका विजय ऑस्ट्रेलियाच्या अगदी आवाक्यात आला होता.

या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये लक्ष्मण तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला आला. त्याने सौरव गांगुलीसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी पार्टनरशिप केली. पण ती पार्टरनरशिप पुरेशी नव्हती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारतीय टीम अजूनही 20 रननी मागे होती. लक्ष्मण आणि द्रविड ही भारतीय बॅट्समनची शेवटची जोडी मैदानात होती.

IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने इतिहास घडवला, टेस्टमध्ये ठोकली Fastest Half Century

चौथ्या दिवशी इतिहास घडला

भारतीय टीम चौथ्या दिवशीच पराभूत होईल असा अनेकांचा अंदाज होता. पण लक्ष्मण आणि द्रविड यांच्या मनात काही वेगळेच होते. ग्लेन मॅग्रा, शेन वॉर्न, गिलेस्पी सारख्या दिग्गज ऑस्ट्रेलियन बॉलर्सचा समावेश असलेल्या आणि यशाची सवय भिनलेल्या ऑस्ट्रेलिन बॉलिंग अटॅक समोर ते दोघे दिवसभर निर्धारानं खेळत होते. त्यांनी संपूर्ण दिवस खेळून काढला. ऑस्ट्रेलियाच्या एकाही बॉलरला या जोडीनं चौथ्या दिवशी दाद दिली नाही. त्यांनी दिवसभरात 335 रन काढले. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताचा स्कोर 4 आऊट 589 असा भक्कम झाला होता.

लक्ष्मण-द्रविडच्या पार्टनरशिपमुळे कोलकाता टेस्ट फिरली. संपूर्ण टीममध्ये लढण्याची जिद्द जागृत झाली. भारताने आधी कोलकाता टेस्ट आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका देखील 2-1 ने जिंकली. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मॅच फक्त वाचवू शकत नाही तर जिंकू देखील शकतो हा विश्वास भारतीय खेळाडूंमध्ये निर्माण झाला.

राहुल द्रविडमुळेच मी....प्रविण तांबेचा चित्रपट येण्यापूर्वी मोठा खुलासा

21 व्या शतकातील निर्भिड टीम इंडियाचा पाया कोलकाता टेस्टने रचला. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियात मालिका बरोबरीत राखली. पाकिस्तानात मालिका जिंकली. परदेशात अनेक संस्मरणीय विजय मिळवले.  विदेशातील टेस्ट सीरिजमध्ये जिद्दीने कमबॅक केले. त्या सर्वांचा पाया 2001 साली कोलकातामध्ये लक्ष्मण-द्रविड या जोडीने केलेल्या पार्टरनरशिपमध्ये रचला गेला होता.

First published:

Tags: Australia, Cricket news, On this Day, Rahul dravid, Team india