• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • On This Day : ब्रायन लारानं केला टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड!

On This Day : ब्रायन लारानं केला टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड!

जागतिक क्रिकेटमधील महान बॅट्समनमध्ये वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन ब्रायन लारा (Brian Lara) याचा समावेश आहे. आजच्या दिवशी (On This Day) 2004 साली ब्रायन लारानं टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड केला.

 • Share this:
  मुंबई, 12 एप्रिल : जागतिक क्रिकेटमधील महान बॅट्समनमध्ये वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन ब्रायन लारा (Brian Lara) याचा समावेश आहे. आजच्या दिवशी (On This Day) 2004 साली ब्रायन लारानं टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड केला. इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये लारानं नाबाद 400 रन काढले. या रेकॉर्डला आता 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही हा टेस्ट क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे. मागच्या 17 वर्षात लाराचा हा रेकॉर्ड कुणालाही मोडता आलेला नाही. इंग्लंडविरुद्धच केला रेकॉर्ड ब्रायन लारानं 16 एप्रिल 1994 रोजी इंग्लंड विरुद्धच 375 रन काढले होते. त्यानं त्यावेळी वेस्ट इंडिजचे महान बॅट्समन सर गॅरी सोबर्स यांचा रेकॉर्ड मोडला. त्यानंतरच्या दहा वर्षात बरंच पाणी वाहून गेलं होतं. वेस्ट इंडिज क्रिकेटचा दबदबा संपला होता. लारा आता एक तरुण बॅट्समन उरला नव्हता. तर तो वेस्ट इंडिजच्या टीमचा कॅप्टन झाला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) याने काही महिन्यांपूर्वीच झिम्बाब्वे विरुद्ध 380 रन करत लाराचा रेकॉर्ड मोडला होता. हेडननं रेकॉर्ड केल्यानंतर काही महिन्यांनीच लारानं पुन्हा एकदा इंग्लंडच्याच बॉलर्सना लक्ष्य केलं आणि 400 रनचा रेकॉर्ड केला. लाराची जबरदस्त खेळी वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटींग करताना 5 आऊट 751 असा विशाल स्कोर उभा केला. लारानं 582 बॉलचा सामना करत नाबाद 400 रन काढले. त्याच्या या खेळीत 43 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. लाराच्या शिवाय रामनरेश सरवाननं 90 तर रिडली जेकब्सनं नाबाद 107 रन काढले. ख्रिस गेलनं देखील 69 रनचं योगदान दिलं होतं. ('या' खेळाडूच्या खळबळजनक कबुलीनंतर क्रिकेट विश्वात झाला होता भूकंप ) इंग्लंडची टीम पहिल्या इनिंगमध्ये कमाल करु शकली नाही. त्यांची पहिली इनिंग 285 रनवरच संपुष्टात आली. इंग्लंडवर 'फॉलो ऑन' ची नामुष्की आली. त्यानंतरही वेस्ट इंडिजला विजय मिळवता आला नाही. इंग्लिश बॅट्समननं पाचव्या दिवशी चिवट खेळ केला. कॅप्टन मायकेल वॉन (Michael Vaughan) याने 140 रन काढले. इंग्लंडनं पाचव्या  दिवसअखेर 5 आऊट 422 रन काढत पराभव टाळला. लारानं 400 रन करत सर्वोच्च वैयक्तिक रेकॉर्ड केला. पण वेस्ट इंडिजला इंग्लंडला पराभूत करण्यात अपयश आलं. चार टेस्ट मॅचची ती मालिका इंग्लंडनं 3-0 अशा फरकानं जिंकली.
  Published by:News18 Desk
  First published: