मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /On This Day: दक्षिण आफ्रिकेच्या 'या' खेळाडूच्या खळबळजनक कबुलीनंतर क्रिकेट विश्वात झाला होता भूकंप!

On This Day: दक्षिण आफ्रिकेच्या 'या' खेळाडूच्या खळबळजनक कबुलीनंतर क्रिकेट विश्वात झाला होता भूकंप!

क्रिकेट विश्व 11 एप्रिल हा दिवस कधीही विसरु शकत नाही. आजच्या दिवशी (On This Day) 2000 साली दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिए  यानं आपण मॅच फिक्सिंगमध्ये (Match Fixing) सहभागी असल्याची कबुली दिली.

क्रिकेट विश्व 11 एप्रिल हा दिवस कधीही विसरु शकत नाही. आजच्या दिवशी (On This Day) 2000 साली दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिए यानं आपण मॅच फिक्सिंगमध्ये (Match Fixing) सहभागी असल्याची कबुली दिली.

क्रिकेट विश्व 11 एप्रिल हा दिवस कधीही विसरु शकत नाही. आजच्या दिवशी (On This Day) 2000 साली दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिए यानं आपण मॅच फिक्सिंगमध्ये (Match Fixing) सहभागी असल्याची कबुली दिली.

मुंबई, 11 एप्रिल :  क्रिकेट विश्व 11 एप्रिल ही तारीख कधीही विसरु शकत नाही. आजच्या दिवशी (On This Day) 2000 साली दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिए (Hansie Cronje) यानं आपण मॅच फिक्सिंगमध्ये (Match Fixing) सहभागी असल्याची कबुली या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या किंग कमिशनपुढं दिली होती. क्रोनिएच्या कबुलीमुळे क्रिकेट विश्वात मोठा भूकंप झाला. भारतीय क्रिकेट टीमलाही (Team India) याचा फटका बसला.

काय होते प्रकरण?

क्रोनिएनं मॅच फिक्सिंगची कबुली देण्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. त्यांनी क्रोनिए आणि बुकी संजीव चावला यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप उघड केली होती. यामध्ये क्रोनिएनं दक्षिण आफ्रिकेचा ओपनर हर्षल गिब्जसह काही आफ्रिकन खेळाडूंचं नाव घेतलं होतं.

क्रिकेट विश्वात तेंव्हा हॅन्सी क्रोनिएचा मोठा दबदबा होता. दिल्ली पोलिसांनी केलेल्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली. क्रोनिएनं तात्काळ हे सर्व आरोप फेटाळले. क्रोनिएच्या देशात म्हणजेच दक्षिण आफ्रिकेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी किंग कमिशनची नेमणूक करण्यात आली. याच कमिशनसमोर 11 एप्रिल 2000 रोजी क्रोनिएनं मॅच फिक्सिंगची कबुली दिली.

काय दिली कबुली?

भारताविरुद्ध कानपूरमध्ये 1996 साली कानपूरमध्ये झालेल्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी मॅच हरण्यासाठी पैसे घेतल्याची कबुली क्रोनिएनं दिली. मुकेश गुप्ता या बुकीनं आपल्याला 30,000 डॉलर दिल्याचं त्यानं मान्य केलं.कानपूर टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 461 रनचा पाठलाग करताना 127 रन मध्ये 6 विकेट गमावल्या  होत्या. त्या दिवशी क्रोनिए सर्वात पहिल्यांदा आऊट झाला. काहीही न करता आपल्याला पैसे मिळाल्याचं क्रोनिएनं सांगितलं.

या कबुलीनंतर क्रोनिएवर आजीवन बंदी घालण्यात आली. या बंदीपूर्वी क्रोनिएनं दक्षिण आफ्रिकेकडून 68 टेस्ट आणि 188 वन-डे खेळल्या होत्या. यापैकी 53 टेस्टमध्ये तो दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन होता.

भारतामध्ये पडसाद

हॅन्सी क्रोनिएनं त्या कबुली जबाबात टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनचंही (Mohammad Azharuddin) नाव घेतलं. त्यामुळे बीसीसीआयनं (BCCI) अझरवर आजीवन बंदी घातली. अझरनं  या बंदीला आव्हान दिलं, अखेर त्याची निर्दोष मुक्तता झाली पण तो टीम इंडियाकडून पुन्हा क्रिकेट खेळू शकला नाही. आता अझरचं भारतीय क्रिकेट वर्तुळात पुनरागमन झालं असून तो सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा (HCA) अध्यक्ष आहे.

(On This Day : डीव्हिलियर्सनं एका पायावर खेळून काढले होते 146 रन!)

क्रोनिएचा अपघाती मृत्यू

हॅन्सी क्रोनिएवर आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी घातल्यानंतर त्यानं खासगी व्यवसायास सुरुवात केली. मात्र या कबुलीजबाबानंतर दोन वर्षांनीच म्हणजे 2002 साली विमान अपघातामध्ये त्याचा रहस्यमय मृत्यू झाला. मॅच फिक्सिंगबद्दलची अनेक रहस्य या मृत्यूमुळे क्रोनिएसोबतच नष्ट झाली.

First published:

Tags: Cricket, On this Day